आपला बीड जिल्हाआपले केजविशेष

केज नगरपंचायतीच्या विकासाचा प्रताप ; तब्बल एका वर्षानी केले दलित वस्तीतील बोअरवेल दुरुस्त

वादळवार्ता – केज

प्रत्येक शहराचा गावाचा विकास करण्यासाठी दलित वस्ती तथा दलित्तोर वस्तीकरिता केंद्र शासन तथा राज्य शासनाकडुन मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो त्यामध्ये रस्ते, पथदिवे , नाले , बोअरवेल , स्वच्छता आदि बाबी येतात.प्रामुख्याने जनरल खात्यामधुन सुद्धा विकासकामा करिता निधी खर्च करता येतो .

या बाबत सविस्तर वृत्त असे कि केज नगरपंचायत च्या अंतर्गत येत असणारे प्रभाग क्र. ९ या प्रभागामधील पाण्याच्या टाकीच्या पश्चिम दिशेस असणारे सर्विसिंग सेन्टरच्या पाठीमागे दलित वस्ती मध्ये असणारे बोअरवेल एका वर्षापूर्वी नादुरुस्त झाले होते. ते बोअरवेल बंद पडल्यामुळे प्रभागातील असंख्य नागरीकांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागल होते. भरपुर पाणी असणारे बोअरवेल दुरुस्ती करीता असंख्य निवेदने देण्यात आल्यानंतर केज नगरपंचायतच्या झोपी गेलेल्या प्रशासनाने ते बोअरवेल तब्बल एक नव्हे , दोन नव्हे तर चक्क एक वर्षानी दुरुस्त करुण एक विकासाचा नवा इतिहास , आध्याय रचला आहे. यामुळे केज शहरातील एकुण १७ प्रभागातील बोअरवेल सत्ताधारी कधी दुरुस्त करणार ? किती वर्षानी करणार ? करणार कि नाही ? आदि प्रश्न जनतेमध्ये चर्चेमधुन समोर येत आहेत

केज नगरपंचायतच्या कर्मचार्‍यांना वेळेवर साधन सामग्री प्रशासन , सत्ताधार्याकडुन उपलब्ध करूण दिली जात नसल्यामुळे , काम करण्याची इच्छा असुन देखील कर्मचार्‍यांना जनतेशी निगडीत कामे करता येत नाहीत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!