दैनिक वादळवार्ता/केज
केज शहरातील क्रांतीनगर येथील तरुणाच्या खून प्रकरणी केज पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी कर्मचारी यांनी तात्काळ कारवाई करत आरोपीस अटक केली त्यास न्यायालयात हजर केले असता त्यास 29 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली .
याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 23/04/2024 रोजी फिर्यादी नामे राज संजय गायकवाड वय 23 वर्षे व्यवसाय मजुरी रा. क्रांतीनगर केज जि बीड यांनी तक्रार पोलीस ठाणे केज येथे तक्रार दिली की, त्यांचा मामे भाऊ गोरख महावीर हजारे वय 18 वर्षे रा. क्रांतीनगर केज यांनी त्यांना फोन करुन सांगितले की, मी क्रांतीनगर केज येथील समाजमंदिर जवळ असुन मला आपले गल्लीत राहणारा सनी शामराव लांडगे याने विनाकारण मारहाण केलेली आहे परत तो मला मारणार आहे तु कोठे आहेस लवकर माझ्याकडे ये, असे फोनवर सांगितल्याने फिर्यादी हा तात्काळ समाजमंदिर जवळ गेला. समाजमंदिर येथे सनी लांडगे व माझा मामे भाऊ गोरख महावीर हजारे हा तेथे उभे होते. गल्लीतील इतर लोक जमा झाले होते फिर्यादीला त्याचा मामे भाऊ हा बोलत असताना अचानक सनी शामराव लांडगे याने काहीतरी लोखंडी शस्त्र (हत्यार) शर्टात आत ठेवलेले बाहरे काढुन गोरख याचे मानेजवळ हत्यार खुपसले त्यामळु गोरख हा रक्तबंभाळ होवुन खाली पडला तेव्हा सनी लांडगे हा तेथुन पळुन गेला. त्यानंतर जखमी गोरख हजारे यास मी व दिपक काळे यांनी गोरख ला उपचारकामी सरकारी दवाखाना केज येथे नेले असता, तेथील डॉक्टरांनी गोरख महावीर हजारे यास तपासुन तो मयत झाल्याचे सांगितले. वगैरे मजकुराच्या फिर्याद वर पोलीस ठाणे केज येथे गुरनं 228/2024 कलम 302 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी यांनी कर्तव्यदक्षता दाखवत बजावली मोलाची कामगिरी
सदर घटनेबाबत ची माहीती पोलीस ठाणे केज येथील पोलीस निरीक्षक श्री प्रशांत महाजन यांना मिळाल्याने त्यांनी लगेच पोलीस ठाणे केज येथील पोलीस उप निरीक्षक श्री आनंद शिंदे, श्री राजेश पाटील, श्री वैभव सारंग व पोलीसअमंलदार पोह/39 बांगर, पोह/1742 चौधरी, पोह/ 1632 अहंकारे, पोह/1673 अहंकारे, पोह/1051 वंजारे, चापोह / 858 दराडे, मपोह/91 पाचपिंडे, पोना/1384चोपणे, पोशि/1624 शेख, पोशि/471 गिते, पोशि/74 कागदे, असे तात्काळ क्रांतीनगर व सरकारी दवाखाना केज येथे जावुन घटनेचे गांभीर्य पाहुन पोनि श्री प्रशांत महाजन यांनी घटनेबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकुर साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई श्रीमती चेतना तिडके मॅडम, मा. सहायक पोलीस अधीक्षक श्री कमलेश मीना साहेब यांना घटनेची माहीती देवुन घटनेची माहीती दिली व वरीष्ठांचे सुचनेप्रमाणे केज शहरात बंदोबस्त लावुन आरोपीचा शोध घेणेकामी पोलीस उप निरीक्षक श्री आनंद शिंदे, पोह/39 बांगर, पोह/1742 चौधरी, पोशि/471 गित्ते, पोशि/74 कागदे, यांनी आरोपीचा तांत्रीक यंत्रणेचा व कौशल्यचा वापर करुन आरोपी नामे सनी शामराव लांडगे हा पळुन जाण्याच्या तयारीत असताना मौजे बोबडेवाडी ता. केज शिवारात असले बाबत माहीती मिळाल्याने मौजे बोबडेवाडी येथे जावुन शेतात लपुन बसलेला सनी शामराव लांडगे यास गुन्हा घडल्यापासुन दोन तासामध्ये शिताफीने ताब्यात घेवुन पोलीस ठाणे केज येथे आनले. गुन्हयातील आरोपी सनी शामराव लांडगे रा. क्रांतीनगर केज याने मयत गोरख महावीर हजारे वय 18 वर्षे रा. क्रांतीनगर केज यास किरकोळ भांडणाचे कारणावरुन धारदार लोखंडी हत्यार त्याचे मानेजवळ खुपसुन जिवे ठार मारले आहे. सदर गुन्हयाचा तपास मा पोनि सो यांचे आदेशाने पोलीस उप निरीक्षक राजेश पाटील हे करत आहेत. सदर अटक आरोपीस आज दिनांक 24/04/ 2024 रोजी मा न्यायालयामध्ये रिमांडकरीता हजर केले असता मा न्यायालयाने अटक आरोपीस दिनांक 29/04/2024 रोजी पर्यत पोलीस कोठडीचे आदेश दिले आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकुर साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई श्रीमती चेतना तिडके मॅडम, मा. सहायक पोलीस अधीक्षक श्री कमलेश मीना साहेब मार्गदर्शना खाली मा. पोलीस निरिक्षक महाजन साहेब, पोलीस उप निरीक्षक पाटील साहेब, शिंदे साहेब, सारंग साहेब पोलीस अमंलदार पोह/39 बांगर,पोह/1742 चौधरी, पोह/1632 अहंकारे, पोह/1673 अहंकारे, पोह/1051 वंजारे, चापोह /858 दराडे, मपोह/91 पाचपिंडे, पोना/1384 चोपणे, पोशि/1624 शेख, पोशि/471 गिते, पोशि/74 कागदे यांनी केलेली आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!