आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी
वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
तालुक्यातील एका गावातील परित्यक्ता महिलेला बळजबरीने पळवून नेऊन लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार करून तिचा गर्भपात केल्या प्रकरणी एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यां विरोधात बलात्कारा, अवैद्य गर्भपात आणि अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेल्या प्रकरणातील नगरसेविकेचा पती अखेर तीन महिन्या नंतर पोलिसांच्या ताब्यात आला असून सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे प्रशिक्षणाला गेल्या नंतर आरोपीने आत्मसमर्पण केले आहे.
केज तालुक्यात अनुसूचित जातीतील परित्यक्ता महीलेवर जनविकास परिवर्तन आघाडीच्या नगरसेविकेचा पती सुग्रीव कराड याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करुन ती दोन महीन्याची गर्भवती असताना तिचा गर्भपात करण्यासाठी; बळजबरीने तिला गर्भपाताच्या गोळ्या खायला देऊन गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. तसेच गर्भपाता नंतरही लग्नाला नकार देत ती अनुसूचित जातीची आहे. म्हणून लग्नाला नकार दिला. त्या नंतर पीडिता केज पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास गेली; म्हणून आरोपी सुग्रीव माणिक कराड, त्याची पत्नी जनविकास परिवर्तन आघाडीच्या नगसेविका आशा सुग्रीव कराड, पंचायत समिती सदस्या मुक्ता माणिक कराड, मिरा मच्छींद्र चाटे, एक अनोळखी महिला यांनी पिडीतेच्या घरी जाऊन तिचा मोबाईल हिसकावून घेऊन तिच्या जवळील नगदी पैसे घेऊन तिला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली होती.
या प्रकरणी पीडितेच्या तक्रारी वरून केज पोलिस ठाण्यात गु र न २६१/२०२२ नुसार बलात्कार, अवैद्य गर्भपात आणि अट्रॉसिटीच्या गुन्हा दाखल झाला होता.
परंतु गुन्हा दाखल होऊनही आरोपी फरार होता तो पोलिसांना चकवा देत होता.
पोलीसांना आरोपी सापडत नाही म्हणुन आरोपी अटकेच्या मागणीसाठी पीडितेने तिचे वृद्द आई-वडील आणि मुलीसह केज तहसील कार्यालया समोर चार दिवस उपोषण केले होते.
सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशानुसार केजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी आरोपी सुग्रीव कराडला लवकरच अटक करण्याचे लेखी आश्वासन दिल्या नंतर पिडीत कुटुंबाने आमरण उपोषण माघे घेतले होते.
दरम्यान दि.२४ सप्टेंबर रविवारी सायंकाळी ६:०० वा. च्या दरम्यान आरोपी सुग्रीव माणिक कराड यास पोलीसांनी ताब्यात घेतले.
सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे प्रक्षिशणाला गेले असल्याने केजचा पदभार बीडचे पोलिस उपअधीक्षक संतोष वाळके यांच्याकडे आल्या नंतर आरोपीने स्वतःहून आत्मसमर्पण केले आहे.
पोलिसांनी आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता दि. २८ सप्टेंबर पर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणी प्रभारी पोलिस उपअधीक्षक संतोष वाळके हे पुढील तपास करीत आहेत.
घटनाक्रम : –
■ दि. ८/१२/३०२१- Nenu स्टॅंड वरून पळवून नेऊन बलात्कार
■ एप्रिल २०२२- गोळ्या खाऊ घालून अर्धवट गर्भपात
■ दि. २७/६/२०२२ – बलात्कार, अट्रॉसिटी व गर्भपाताचा गुन्हा दाखल
■ दि. ३०/८/२०२२ – पीडितेचे आरोपीच्या अटकेसाठी उपोषण
■ दि. ३/९/२०२२ – सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या आश्वासना नंतर उपोषण मागे
■ दि. २५ /९/२०२२ रोजी आरोपी अटक
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!