वादळवार्ता वार्तांकन – केज
सविस्तर वृत्त असे कि केज तालुक्यातील नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या आहेत त्यातच तालुक्यातील बेळगाव – केळगाव येथील ग्रामपंचायत वरती राष्ट्रवादीचे खंडु चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तर पॅनल प्रमुख उमेश नाना चौरे यांच्या प्रयत्नामुळे बेळगाव केळगाव ग्रामपंचायत वरती एकहाती सत्ता आल्यानंतर आज पदग्रहण सोहळ्याच्या अनुशंगाने उपसरपंच म्हणून रुक्मिणीबाई उत्तरेश्वर घुले यांची निवड करण्यात आली आहे तर उपसरपंच पदी रुक्मिणीबाई घुले यांंची निवड झालेमुळे ग्रामपंचायत वरती एकुण १० पैकी ६ महिला त्यामध्ये सरपंच – उपसरपंच महिलाकडे आल्यामुळे सदरील ग्रामपंचायत वरती महिलाराज स्थापित झाले आहे.

या पदग्रहन कार्यक्रमा प्रसंगी नवनिर्वाचित ग्रामपंचायतचे सदस्य सौे देवईबाई जयद्रथ चौरे,सौ छाया बाळासाहेब दुनघव ,सौ गवळण बाई दादाराव घुले ,सौ वच्छला रवींद्र घुले,श्री गोरख रंगनाथ भांगे, गोरख नागनाथ घुले,विठ्ठल भगवान दातार ,अश्रुबा अण्णा चौरे आदिसह बेलगाव केळगाव रामनगर येथील सहकारी मित्र व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.