आपला बीड जिल्हाआपले केजक्राईम
मुकादमाची चोरी करणारे बीडचे दोन चोरटे केज पोलिसांनी घेतले ताब्यात

वादळवार्ता – गौतम बचुटे
यवतमाळ जिल्ह्यातील ऊस तोड मुकादम हे रात्री केज बस स्टँडवर झोपले असता त्यांचे मोबाईल आणि पैसे चोरणाऱ्या दोघांना केज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील चिंचघाट ता पुसद येथील मिलिंद देविदास राठोड आणि त्यांचे साडू इंदर बलदेव राठोड हे मोटारसायकल वरून त्यांचे गावी जात असताना दि. १ एप्रिल रोजी रात्र झाली म्हणून ते केज बस स्टॅंड मध्ये झोपले. ते झोपेत असताना त्यांच्या जवळील विवो कंपनीचा मोबाईल आणि नगदी २० हजार रु. असा ऐवज अज्ञात चोरट्यानी चोरला. पैसे आणि मोबाईल चोरी झाल्याचे लक्षात येताच मिलिंद राठोड याने केज पोलीस ठाण्यात ही चोरीची माहिती दिली. त्या नंतर पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सिंघम महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल रुक्मिण पाचपिंडे आणि पोलीस नाईक राजू गुंजाळ व पोलीस नाईक आनंद ईनकर यांनी संशया वरून शेख जुबेर शेख अबुद रहेमान रा. धांडे गल्ली कारंजा बीड आणि अमेर आयुब पठाण रा. इस्लामपुरा बीड या दोघांना ताब्यात घेतले.
या प्रकरणी मिलिंद राठोड यांच्या फिर्यादी वरून शेख जुबेर व अमेर पठाण दोघे रा बोड यांच्या विरुद्ध गु. र. न. १९३/२०२३ भा. दं. वि. ३७९ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
शिताफीने आटोपी ताब्यात घेतले :- चोरीची माहिती मिळताच महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल रुक्मिण पाचपिंडे यांनी पोलीस नाईक राजू गुंजाळ व आनंद ईनकर यांना सोबत घेऊन बस स्टॅंडच्या परिसरात शोध घेत असताना शेख जुबेर व अमेर पठाण हे एका हॉटेल मध्ये बसलेले असताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्या हलचालीकडे बारकाईने लक्ष ठेवून खात्री पटताच त्यांना अचानक झडप घालून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चोरीला गेलेला मोबाईल आढळून आला. त्या नंतर त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सॅमसंग व विवो कंपनीचे दोन मोबाईल या सह २८ हजार ४१० रु. चा मुद्देमाल त्यांच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आला .
त्या दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी :- ऊस तोड मुकादमाच्या चोरीतील आरोपी शेख जुबेर व अमेर पठाण या दोघांना न्यायालयाने दि. ३ एप्रिल पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.



