आपला बीड जिल्हा

गेवराई कृषी अधिकारी यांनी शेतकरी वर्गासाठी 110 मे. टन युरियाची वाटप केले खुले

वादळवार्ता प्रतिनिधी – गेवराई

गेवराईचे कृषी अधिकारी अभयकुमार वडकुते यांनी गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामा करता युरिया खताचा व डी. ए.पी. गेवराई तालुक्या करिता विक्री खुली करण्यात आली आहे.

युरिया 110 मे. टन व 60 मे. टन एवढे खत शेतकऱ्यांसाठी विक्रीसाठी कृषी अधिकारी यांनी खुले करून दिले आहे.

             गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांना खताचा तुटवडा भासू नये म्हणून शेतकऱ्यांसाठी खुली खत विक्री करण्यात आली आहे , पावसाळी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे चार महिने असतात या चार महिन्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी खते महत्त्वाची आहे, ह्याच खत वर शेतकऱ्यांचे पूर्ण पिक अवलंबून असते त्या पिकांसाठी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून शेतकरीवर्गांसाठी गेवराई तालुक्यातील कृषी अधिकारी यांनी तातडीने खत वाटप केली आहे व या खत वाटप चा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा असे त्यांनी सांगितले .

गेवराई तालुक्यामधील खत विक्री जास्त भावाने होत असल्यास त्याची लेखी स्वरूपात तक्रार कृषी अधिकारी यांना दिल्यास सदरील विक्रि केद्रांवर तात्काळ कार्यवाही करण्यात येईल अशी कृषि अधिकारी अभय वडकुते कृषी यांनी सांगितले .

गेवराई तालुक्यातील कृषि अधिकारी ऑफिस यांच्या कडून पोषण युक्त सुरक्षित अन्न योजना गेवराई तालुक्यासाठी राबवली जात आहे

या मध्ये गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी १०९६ भाजी पाला किट वाटप करण्यात आले.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!