आपला बीड जिल्हा

श्री संस्कार कॉम्प्युटर एज्युकेशन च्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा 

वादळवार्ता वार्तांकन – शाहेद खतीब

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील श्री संस्कार कॉम्प्युटर एज्युकेशन च्यावतीने चिंचोली माळी परिसरातील दहावी बोर्ड (SSC) परिक्षेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या, विषेश प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे व JUNE EXAM EVENT च्या MS-CIT परिक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाला.

यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिंचोली माळी येथील सरपंच मा.श्री. सुनील बापु देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ विधिज्ञ अॅड. मा. श्री.भुजंगराव गलांडे, मा. श्री. ह.भ.प. आबा महाराज मेहरकर, केज येथील सुप्रसिध्द न्यू इंटेल कॉम्प्युटर्स चे संचालक मा.श्री. गणेश सत्वधर सर, मा.श्री. काळे साहेब, (सा. बां. वि. केज), मा. श्री श्रीमंत नखाते, (सा.बा.वि. धारुर), मा.श्री. हरिभाऊ यादव, अध्यक्ष आचार्य विनोबा भावे सार्वजनिक वाचनालय चिंचोली माळी यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना श्री आबा महाराज मेहरकर यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द, चिकाटी बाळगावी असे आवाहन केले तर संचालक अनिल गलांडे यांनी ईतर प्रलोभनांना बळी न पडता विद्यार्थ्यांनी शैक्षणिक स्पर्धैत उतरावे असे मोलाचे मार्गदर्शन केले.

दहावी बोर्ड (SSC) परिक्षेत उत्कृष्ट कामगिरी केलेले विद्यार्थी.

1) कु.सायली अनिल गलांडे, 95.20, 2) सुजाता बाळासाहेब वनवे, 94.60, 3) चि. संकेत उत्तरेश्वर राऊत, 94, 4), चि. आरिफ मोहम्मद शरीफ पठाण, 92.60, 5) कु. रूपाली अशोक निंगुळे, 92,6) कु.साक्षी अनिल घोडके, 91,7) कु. अंजली अशोक हुंबे, 90.20,8) कु. अमृता बिभीषण गलांडे, 90.20,9) चि. संकेत विनायक गलांडे, 90.20,10) चि. करण साहेबराव बजगुडे, 87.40, 11) चि. ओमकार नंदकुमार गायकवाड, 87 तर एम सी आय टीच्या जुन महिन्याच्या झालेल्या परिक्षेत श्री संस्कार कॉम्प्युटर एज्युकेशन चे विशेष प्राविण्य मिळविलेले विद्यार्थी यामध्ये प्रामुख्याने

1) कु. पुनम परमेश्वर भुसारे, 96% 2) चि.आरिफ मोहम्मद शरीफ पठाण, 96%3) कु. वैष्णवी दत्तात्रय गायकवाड, 95%4) चि. शुभम अरुण राऊत, 93% व विशेष सन्मान कु. अश्विनी मोहन घुले, 92% यांचा सत्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्री संस्कार एज्युकेशन ग्रुपचे संचालक अनिल गलांडे, अमोल गलांडे, प्रशिक्षिका अकांक्षा गालफाडे, आदित्य गलांडे व विद्यार्थ्यांसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!