केज । प्रतिनिधी
२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून जीवन शिक्षण शैक्षणिक संकुल, केज येथे भव्य योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये योगाबद्दल जनजागृती निर्माण व्हावी व त्यांचा सर्वांगीण विकास साधावा, या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष हारुण इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक रमाकांत ठाकणे, प्रा. धम्मपाल गायकवाड, लोंढे सर, शेख सर तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.योग प्रशिक्षक मुथळे सर यांनी विद्यार्थ्यांना ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, वज्रासन, प्राणायाम, अनुलोम-विलोम यांसारख्या विविध योगासने करून दाखवली. त्यांनी योगासने करताना योग्य श्वसन पद्धती, शरीरसंचालन आणि मन एकाग्र करण्याचे तंत्र शिकवले.मार्गदर्शन करताना मुथळे सर म्हणाले, “योग हा भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे. तो केवळ शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी नव्हे तर मानसिक आरोग्य, मनःशांती, तणावमुक्त जीवन आणि आत्मसंवेदनासाठीही अत्यंत उपयुक्त आहे.”मुख्याध्यापक रमाकांत ठाकणे यांनी विद्यार्थ्यांना दररोज योगासने करण्याचे आवाहन करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील शैक्षणिक यशाबरोबरच मानसिक स्थैर्यही तितकेच महत्त्वाचे आहे. योग हे त्या दृष्टीने प्रभावी साधन आहे.”
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिस्तबद्धरीत्या सहभाग घेत योगासने केली. काही विद्यार्थ्यांनी आपले अनुभवही शेवटी बोलून दाखवले.कार्यक्रमाचे संयोजन क्रीडा विभाग व शिक्षकांच्या सहकार्याने करण्यात आले. शेवटी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबद्दल जागरूकता वाढली असून अनेकांनी रोजच्या जीवनात योगाभ्यासाचा अंगीकार करण्याचा निर्धार केला.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!