आपला बीड जिल्हाआपले केजक्राईम

केज तालुक्यातील खळबळजनक घटना

पवित्र नात्याला काळीमा

वादळवार्ता – गौतम बचुटे

युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत भावा बहिणीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी खळबळजनक घटना घडली आहे. सख्ख्या चुलत भावाने अल्पवयीन सख्ख्या चुलत बहिणीला पळवून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

या बाबतची माहिती अशी की, धारूर तालुक्यातील एका गावातील एक अल्पवयीन साडे सतरा वर्ष वयाची दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली मुलगी ही अंबाजोगाई तालुक्यातील आणि युसुफवडगाव ता. केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत मामाच्या गावी आजोळी आली होती.

दि. ३१ मे रोजी ती अल्पवयीन मुलगी घरी आढळून आली नाही. ती मुलगी आढळून न आल्याची माहिती मामाने मुलीच्या आई-वडिलांना फोनवरून ती बेपत्ता असल्याची माहिती दिल्या नंतर मुलीचा शोध घेतला; परंतु ती आढळून आली नाही. म्हणून मुलीच्या आईच्या फिर्यादी वरून दि. २ जून रोजी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात त्यांच्या अल्पवयीन मुलीस त्यांच्या सख्ख्या पुतण्याने अज्ञात कारणासाठी पळवून नेली असल्याची तक्रार दिली आहे. या वरून सख्ख्या चुलत भावानेच सख्ख्या चुलत बहिणीला अज्ञात कारणासाठी पळवून नेल्या प्रकरणी गु. र. नं. ११७/२०२३ भा. दं. वि. ३६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास तुपारे हे करीत आहेत.

चार महिन्या पूर्वी याच नराधम चुलत भावाने पळवून नेलेल्या अल्पवयीन चुलत बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी धारुर पोलीस गुन्हा दाखल झालेला आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!