Uncategorized

स्मशानभूमी दुरुस्त करा ; दुरुस्ती न केल्यास नगरपंचायत  समोर प्रतिकात्मक अंत्यविधी करणार – भाई मोहन गुंड

वादळवार्ता – केज 

दि.२७ जुलै – केज शहर हे जवळपास ५० ते ६० हजार लोकसंख्येचे असून, शहरांमध्ये दोनच सार्वजनिक स्मशानभूमी आहेत. त्यांची बिकट अवस्था झाली आहे त्या तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी शेकापचे भाई मोहन गुंड, भाई अशोक रोडे यांनी निवेदनाद्वारे मुख्य अधिकाऱ्याकडे केली केली आहे.

केज शहरात दोन स्मशानभूमी आहेत १) क्रांतीनगर कानाडी रोड,२) मारुती मंदिर जुने गाव या दोन्ही ही स्मशानभूमीची अत्यंत दूर अवस्था झालेली आहे. रात्रीला आंतविधी करण्यासाठी तिथे लाईटची नाही, पाण्याची नाही बसायला सुध्दा व्यवस्था नाही पाऊस पडला तर प्रेत जाळण्याची देखील व्यवस्था नाही. दि २७ रोजी रोडे कुटुंबातील व्यक्तचे निधन झाले अंत्यविधी साठी नेमण्यात आले तर क्रांतीनगर स्मशानभूमीत ज्या ठिकाणी प्रेत ठेवून अग्नी दिला जातो त्याच ठिकाणी गुडघ्या इतके पाणी साचल्यामुळे प्रेत कुठे जाळावं ही परिस्थिती निर्माण झाली होती. बाजुला कसे बसे आंतविधी केला पाऊस असल्यामुळे रोडे कुटुंबियांवर वाईट वेळ होती. किमान माणसाच्या प्रेताची तरी कुचबंना, आवहेलना होऊ नये, आपण तात्काळ दोन्ही स्मशानभूमीची पाहणी करुन दुरुस्ती आठ दिवसात स्मशनभूमीची दुरुस्ती करावी आठ दिवसांत न झाल्यास केज नगरपंचायतच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर प्रतीकात्मक अतविधी आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे राज्य मध्यवर्ती समिती सदस्य भाई मोहन गुंड अशोक रोडे, यांनी निवेदनाद्वारे दिला आहे….

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!