आपला बीड जिल्हा

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना बीड च्या जिल्हाध्यक्ष पदी राहुल उंडाळे यांची निवड

बीड । प्रतिनिधी

दि ७ जुन वार शनिवार रोजी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना शाखा बीडची शासकिय विश्रामगृह बीड येथे सहविचार सभा मा नितीनजी महुवाले विभागीय संघटक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. २०१४ पासून जिल्हाध्यक्ष म्हणून विष्णु आडे हे संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कालावधीत जिल्हास्तर, राज्यस्तर वर वेगवेगळी आंदोलने, मोर्चे , संप अशी विविध स्वरूपाची कामगिरी करून त्यांनी संघटनेला मोठी नावलौकिक मिळवून दिली. वैक्तिक अडचणी मुळे विष्णु आडे यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे जिल्हाध्यक्ष पदासाठी लोकशाही पद्धतीने जिल्हा प्रवक्ते एक हुशार, प्रशासनाची जाण आलेले, अभ्यासू व्यक्तिमत्व ,संघटन कौशल्य , असलेलेल राहुल उंडाळे यांची *महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना बीड च्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.* सदर बैठकीस जिल्हा पदाधिकारी व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.

    संघटनेतील सर्व पदाधिकारी, आणि शिलेदार यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवुन जिल्हाध्यक्ष पदी निवड केल्यामुळे संघटन वाढीसाठी आणि समस्यांची सोडवणूक करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे त्यांनी ग्वाही दिली. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष विष्णू आडे सर, जिल्हा उपाध्यक्ष महादेव नरवडे सर, जिल्हा संघटक भुषण टेके सर, तसेच सर्व तालुकाध्यक्ष आनंद लाड, माणिक राठोड, विकास खेडकर, सुनिल वारे, किशोर भालेराव, जितेंद्र दहिफळे, रघु यादव, अशोक भोजने व तांलुका पदाधिकारी गोविंद वायकर, मुकुंद रसाळ, संजिव राठोड, नितीन फसले, भिवराज कोकणे, योगेश सोळसे, दयावान कुटे, मुकुंद खांडे, मोहन परभणे, प्रदिप गायकवाड, शेख सर, शरद गायके, अमोल कांबळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!