केज :- प्रतिनिधी
केज तालुक्यात काही शेतकऱ्यांचे पेरलेले सोयाबीन बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी कृषी विभागाकडे दिलेल्या आहेत, याचा कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन तात्काळ पंचनामे करत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रवीण खोडसे यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
यावर्षी तब्बल एक महिना पाऊस उशिरा झाल्याने पेरण्या लांबल्या त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्थ पाहावयास मिळत होता. त्यातच खत-बियाण्यांचे वाढलेले दर शेतकऱ्यांसमोर ‘ आ ‘ वासून उभे असतानाही शेतकऱ्यांनी महागलेले बियाणे आणि खते विकत घेऊन आपल्या शेतात पेरणी केली. परंतु काही शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाणे न उगवल्याने पुन्हा त्यांना कपाळावर हात आणून घेण्या शिवाय दुसरे काहीच उरले नाही. सोयाबीन बियाणे न उगवलेल्या शेतकर्यांनी आपली तक्रार केज पंचायत समिती आणि कृषी विभाग यांच्याकडे केली होती त्यांचा पंचायत समिती आणि कृषी विभाग तात्काळ पंचनामा करावा व सबंधित कंपनीवर बोगस बियाणे विकल्या प्रकरणी गुन्हा दाखल करत शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी अशी मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रवीण खोडसे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
सदरील निवेदनावर प्रवीण खोडसे ,तालुकाध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष यांच्यासह इतर जनांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!