केज तालुक्यातील मौजे सुकळी येथील भ्रष्टाचाराची चौकशी थातुर – मातुर
परत सखोल चौकशी करा अन्यथा आमरण उपोषण - ग्रामस्थांचा इशारा
केज वादळवार्ता प्रतिनिधी – शाहेद खतीब
केज तालुक्यातील मौजे सुकळी येथील ग्रामपंचायत संध्या चांगलीच चर्चेत आहे .
ग्रामपंचायत च्या माध्यमातुन गावामध्ये रस्ता, नाला , पथदिवे , पाण्याची पाईपलाईन , अंगणवाडी मधील फर्नीचर, अंगणवाडी मधील मुलांचे ड्रेस, फिल्टर मशीन, दलित वस्तीमधील रस्ते अश्या विविध विकासकामे करण्यासाठी चौदाव्या वित्त आयोगामधुन मोठ्या प्रमाणात निधी आला . परंतु सदरील कामाकरिता निधी खर्च न करता बनावट पावत्याच्या आधारे निधि हडप केला असे मौजे सुकळी येथील ग्रामस्थांचे म्हणणे आपल्या तक्रार निवेदणातुन विभागीय आयुक्त , जिल्हाधिकारी, तहसिलदार याना कळवले असता , विभागीय आयुक्त औरंगाबाद , जिल्हा परिषद बीड यांचे मौजे सुकळी येथील ग्रामपंचायतची चौकशी करण्याचे पत्रान्वये आदेश दिले म्हणुन आज दि. ३० जुन २०२२ रोजी गटविकास कार्यालया अंतर्गत मौजे सुकळी येथील ग्रामपंचायतची चौकशी करण्यासाठी केज पंचायत समीतीचे विस्तार अधिकारी चौरे ए.बी . व प्रभारी विस्तार अधिकारी काशिद एस . व्ही यांना पाठवले असता , सदरील ठिकाणची सखोल चौकशी न करता थातुर मातुर चौकशी करून ग्रामस्यांच्या सह्या घेण्याचा प्रयत्न केला परंतु ग्रामस्थानी सह्या न देता पंचायत समीती केज येथे परत सखोल चौकशी करावी या आशयाचे तक्रार निवेदन गटविकास अधिकारी यांना देण्यात आले सदरील निवेदनावर धोडीराम चंद्रभान खाडे, विनोद विलास काटकर, अमर गायकवाड, शाहु रघुनाथ गायकवाड , गणेश अंकुश गायकवाड , लालगीरी गुलाब गिरी , अमोल आत्माराम खाडे, अशोक विनायक गायकवाड, बालाजी हरिभाऊ गिरी, अशोक बजरंग मस्के आदिच्या सह्या आहेत .



