आपला बीड जिल्हाक्राईम

दारू उधार का देत नाहीस ? म्हणून बार मालकाला तलवारीने मारहाण करून ३५ हजाराचा ऐवज लांबविला

वादळवार्ता /गौतम बचुटे

एका बिअर बारच्या मालकाला उधार दारू का देत नाहीस ? असे म्हणून एकाने तलवारीने मारहाण करून रोख रक्कम व सोन्याची चैन पळवून नेली.

या बाबतची माहिती अशी की, दि. ३० सप्टेंबर रोजी दुपारी ४:०० नांदूरघाट येथे शिरूर रोडवरील अंकुश मोराळे यांच्या मालकीच्या बिअर बारमध्ये एक जन आला. त्याने अंकुश मोराळे यास दारू उधार मागीतली. तेव्हा त्याला ऊधार दारू दिली नाही. दारू उधार का दिली नाही म्हणून त्याने शर्टाचे आतमध्ये पाटीवर लपवून ठेवलेली धारदार तलवार काढुन अंकुश मोराळे यांच्या उजव्या डोळ्याच्या बाजूला मारून दुखापत केली. तेव्हा हॉटेल मधिल वेटर विष्णु आश्रुबा मोराळे हा धावत आला. तेवढ्यात आरोपीने  हॉटेलच्या गल्ल्यातील नगदी १० हजार रूपये व गळ्यातील सोन्याची ३ तोळ्याची २५ हजार रु. ची चैन काढून घेत स्कुटी वर बसून निघून गेला.

या प्रकरणी अंकुश झुंबर मोराळे यांच्या फिर्यादी वरून आरोपी विरुद्ध गु र नं ५९३/२०२३ भा दं वि ३२४, ३२७ आणि तलवारीने वार केला म्हणून शस्त्र अधिनियम २५ व ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दूरस्थ नांदूरघाट पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जसवंत शेप हे तपास करीत आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!