केज विधानसभा

आ नमिता मुंदडांमुळे मतदार संघातील रस्ते होताहेत चकाचक ; दर्जेदार रस्त्यांमुळे दळणवळण झाले सुकर

केज । प्रतिनिधी

 केज मतदार संघात मागील काही महिन्यांमध्ये रस्त्यांची कामे गतीने व दर्जेदार पद्धतीने होत असल्यामुळे रस्त्यांमुळे दळणवळणाच्या साधनांत वाढ झाली आहे. ग्रामीण, दुर्गम भाग तालुक्‍यांना जोडले गेल्‍याने सर्वसामान्यांना नोकरी-व्यवसाय करणे सुलभ झाले आहे. बाजारपेठा जवळ असल्‍याने प्रवासाचा वेळ कमी झाला आहे. आर्थिक वृद्धीमुळे जीवनमान उंचावले आहे. चांगल्या रस्त्यांच्या पायाभूत सुविधांमुळे मालमत्तेचे मूल्यही वाढले आहे. याचे सर्व श्रेय केज विधानसभेचे आमदार सो नमिता अक्षय मुंदडा यांनाच जाते असे म्हणले तर ते अतिशोक्ती ठरणार नाही .

तस पाहिला तर केज तालुका हा क्षेत्रफळाने आणि लोकसंख्येने मोठा आहे.त्याबरोबरच केज विधानसभा ही केज व अंबाजोगाई या दोन तालुक्यातील लोकसंख्या एकत्र करून तयार केलेला मतदार संघ आहे.केज तालुक्यात एकूण २२४ गावे असून या गावांना जोडण्यासाठी व तेथील दळणवळण वाढवण्यासाठी तसेच या गावांचा रस्त्यांचा व इतर विकास करण्यासाठी नामदार नमिता ताई मुंदडा यांनी पाठपुरावा करायला सुरुवात केली.व रस्त्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणून गावचा तालुक्याचा विकास केला. यामुळे केज विधानसभेतील गावे एकमेकांना जोडली गेली. याच विकासकामानं मुळे आमदार नमिता मुंदडा यांचे सर्वस्तरातून अभिनंदन तर होतेच आहे.

तर खेड्यापाड्यावाड्या वस्तीतून एकच सुर निघत आहे कि पुन्हा एकदा आमदार नमिता मुंदडा यांनाच विधानसभेत पाठवायचे आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!