आंदोलनकेज विधानसभा

रस्ता एक पण बिले दोनदा! बीडमध्ये भ्रष्टाचाराची प्रचिती?

देवगाव-रेणुकामाता रस्त्याचे निकृष्ट काम ; कैलास मुंडे व गावकऱ्यांचे आमरण उपोषण

केज | प्रतिनिधी

केज तालुक्यातील प्रसिद्ध रेणुकामाता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत गावकरी आक्रमक झाले आहेत. देवगाव ते रेणुकामाता मंदिरापर्यंतचा रस्ता आमदार निधी आणि जिल्हा परिषदेमार्फत मंजूर झाला. मात्र या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून, पहिल्याच पावसात रस्त्याची चाळण झाली आहे. भाविकांची गैरसोय व गावकऱ्यांचा संताप :या रस्त्याचा उपयोग दररोज शेकडो भाविक करतात. पावसाळ्यात रस्ता इतका खराब झाला आहे की, गाड्या अडकतात, पादचाऱ्यांना घसरणे, चिखलातून वाट काढावी लागणे अशा समस्या वाढल्या आहेत. भाविकांचे हाल तर सुरूच आहेत, पण गावकऱ्यांनाही या रस्त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे.

कैलास मुंडे काय म्हणाले ? येथे क्लीक करा

कैलास मुंडे यांचे आमरण उपोषण सुरु : या भ्रष्टाचाराच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते कैलास मुंडे यांनी गावकऱ्यांसह केज तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात लहान मुलांपासून ते वृद्ध नागरिकांपर्यंत मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. महिलांचाही मोठा सहभाग असून, साऱ्यांचाच एकच सूर – “आमच्या गावाशी अन्याय सहन केला जाणार नाही!”

“चौकशी नाही केली, तर पालकमंत्र्यासमोर आत्मदहन” – कैलास मुंडे : दैनिक वादळ वार्ता शी बोलताना कैलास मुंडे म्हणाले, “रस्त्याचे बिल दोन वेळा काढले गेले. एकच रस्ता, पण दोनदा निधी मंजूर करून गुत्तेदार आणि अधिकाऱ्यांनी हातमिळवणी केली आहे. याची चौकशी झालीच पाहिजे. अन्यथा आम्ही पालकमंत्र्यांच्या समोर आत्मदहन करू.”

प्रशासन गप्प, आंदोलन पेटते : या गंभीर प्रकाराबाबत अद्याप प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. उलट प्रशासनाचे मौन गावकऱ्यांच्या संतापाला खतपाणी घालत आहे. गावकरी म्हणतात, “जर देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याचेच असे हाल असतील, तर गावाच्या इतर विकासकामांचे काय?”

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!