वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
शिंदे-फडणवीस यांच्या सरकारच्या वतीने दिवाळीसाठी गरिब कुटुंबांना देण्यात येणाऱ्या आनंदाचा शिधा साळेगांव ता. केज येथे वाटप करण्यात आला.

गरिबांच्या घरातही दिवाळी साजरी करता यावी म्हणून शिंदे फडणवीस सरकारने सार्वजनिक वितरण व्यवस्थे मार्फत आनंदाचा शिधा ही महत्वकांक्षी योजना सुरु केली आहे. यात १०० रु. मध्ये रवा, साखर, तेल आणि चणा डाळ याचा समावेश आहे.
दि. २९ ऑक्टोबर रोजी साळेगांव येथे सय्यद एन. आय. आणि वाय. एम. स्वामी यांच्या स्वस्त धान्य दुकानात याचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी सय्यद जब्बू, गणेश मुळे, पत्रकार गौतम बचुटे, पांडुरंग इंगळे यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.
आनंदाचा शिधा पोहोचला दिवाळी झाल्या नंतर ! :-आनंदाचा शिधा आता दिवाळी झाल्या नंतर लाभार्थ्यांना मिळाला असल्याने गरीब कुटुंबात शिधा उशिरा मिळाल्याचे दुःख तर उशिरा का होईना पण मिळाला! याचा आनंद व्यक्त होत आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!