वादळवार्ता – केज
केज तालुक्यातील बोरगाव बीड आणि धाराशीव जिल्ह्याच्या सीमेवर असलेले गाव आहे. या गावातून मांजरा नदी वाहते. नदी ओलांडताच धाराशीव जिल्ह्यातील गावांचा शिवार सुरू होतो. नदीच्या अलीकडे केज तालुक्यातील बोरगाव हे गाव आहे या गावातील नदी जवळील शिवाराला गाडेमोडी नावाने ओळखतात गाडेमोडी शिवारात त्र्यबंक हरीदास लांडगे यांची अंबराई आहे. शुक्रवारी सकाळी ८:०० वाजता आंबे उतरण्यासाठी लांडगे अंबराईत गेले असता त्यांना नदीतून बिबट्या आल्याचे दिसले. तेव्हा ते तात्काळ आंब्याच्या झाडावर चढले. बिबट्या जवळील शेतातील ऊसात गेल्यानंतर त्यांनी तेथून पळ काढला.
त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती बोरगाव, परिसरातील शेतकऱ्यांना दिली. त्यामुळे बोरगाव शिवारातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!