अपघातआपले केज

सारणी-सांगवीच्या वळणावर अपघात : मोटार सायकलस्वार जखमी

वादळवार्ता – गौतम बचुटे

केज-मांजरसुंबा रोडवर सांगवी-सारणी जवळ रस्त्याच्या वळणावर एक इर्टीगा आणि मोटार सायकलीचा अपघात झाला. अपघातात मोटार सायकलस्वार जखमी झाला आहे.

दि. १० ऑगस्ट बुधवार रोजी ४:०० वा. च्या सुमारास केज-मांजरसुंबा या महामार्गावर सारणी सांगवीच्या पुला जवळ असलेल्या वळणावर एक इर्टीगा आणि मोटार सायकल क्र. (एम एच-२५/ए ओ-१११४) चा अपघात झाला. अपघातात निलराज महादेव गुंजाळ ( रा. कळंब जि. उस्मानाबाद) याच्या पायाला गंभीर मार लागून ते जखमी झाले आहेत. जखमीला उपजिल्हा रुग्णालय केज येथे प्रथमोचार करून पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे हलविले असल्याचे कळते.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!