केज विधानसभानिवडणुक

प्रीतमताई मुंडे यांनी केज मतदारसंघ काढला पिंजून 

केज : प्रतिनिधी 

केज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आज भाजप महायुतीच्या उमेदवार सौ.नमिता अक्षय मुंदडा यांनी कासारी,तरनळी, कोल्हेवाडी,नागझरी, काळूचीवाडी या गावांना भेटी दिल्या. या भेटीदरम्यान गावातील सर्व सामान्य मतदार बंधू-भगिनींशी संवाद साधला.

आपल्या महायुती सरकारचे गतकाळातील कामे व सर्व कल्याणकारी योजना डोळ्यासमोर ठेवून आणि केज परिसरातील विविध कामांचा संदर्भ घेत येत्या २० तारखेला मला आपले मतदानरुपी आशीर्वाद देऊन पुन्हा एकदा जनतेच्या सेवेची संधी द्यावी अशी विनंती केज मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवार सौ नमिता अक्षय मुंदडा यांनी यावेळी केली.

या प्रसंगी भाजप महायुतीच्या उमेदवार सौ नमिता अक्षय मुंदडा यांच्या दौऱ्यात तमाम ग्रामस्थ, आजी-माजी सरपंच, ग्रा. सदस्य, सोसायटी चेअरमन, भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकंदरीतच सद्याचे केज मतदारसंघातील वातावरण पाहता भाजप महायुतीच्या उमेदवार सौ नमिता अक्षय मुंदडा यांचे निवडणूक चिन्ह कमळ जोमात आहे अशी मतदारसंघातून सगळिकडे चर्चा ऐकायला मिळत आहे. यामुळे भाजप महायुतीच्या उमेदवार सौ नमिता अक्षय मुंदडा यांचा विजय सोपा झाला आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!