वादळवार्ता वार्तांकन – महादेव काळे
महाराष्ट्रातील जनतेचे लोकनायक , मराठा आरक्षणाचे लढवय्ये क्रांतीसुर्य महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचे आधारवड शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष मा.आ.स्व विनायकरावजी मेटे साहेब यांच्यावर प्रेम करणारे पंचक्रोशीतील नागरीक,कार्यकर्ते, शिवसंग्रामचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष आदरणीय स्व.विनायकरावजी मेटे साहेब यांचे जीवाचे आजी ,माजी पदाधिकारी स्व. मेटे साहेबांची लोकप्रियता महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात असंख्य कार्यकर्ते यांनी खुप जवळुन पाहिले आहे अशा सर्वांना लोकनायक मेटे साहेब यांचे अंतिम आस्थी कलश दर्शन व शोकसभेचे आयोजन साईधाम हॉस्पिटल धनेगाव कॅम्प येथे दिनांक 20/8/22 रोजी ठिक 3.50 वाजता केले आहे. केजचे सुपुत्र स्मृतिशेष लोकनेते विनायकराव मेटे हे केज तालुक्याचे सुपुत्र व महाराष्ट्राचे नेते होते. त्यांनी मराठा समाजासह बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी प्रखर संघर्ष केला.
अशा या नेत्यांचे केज तालुक्यातील प्रत्येकाशी व्यक्तिगत संबंध होते. यानिमित्ताने त्यांच्या आठवणी व त्यांच्याप्रती भावना व्यक्त करण्यासाठी त्यांचे अंतिम आस्थी कलश दर्शन व शोकसभेचे आयोजन केले आहे तरी सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व सामाजिक संस्था तसेच सर्व नागरिकांनी या अंतिम आस्थी दर्शनासाठी व शोकसभेस उपस्थित राहण्याचे आवाहन युसुफ वडगाव सर्कल चे डॉ उत्तम खोडसे यांनी केले आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!