केज। प्रतिनिधी
केज नगरपंचायतची सत्ता जनविकास परिवर्तन आघाडी व कॉग्रेस मिळुन स्थापन झालेली आहे . जनविकास परिवर्तन आघाडीचे हारुण इनामदार हे केज शहरामध्ये भाजपाचे काम मागील ०९ वर्षा पासून पाहतात . यावेळी लोकसभेला देखील निवडणुकीचे शहरातील कामकाज त्यांनीच पाहिले होते.मागील न.प केजच्या निवडणुकीत शहरातील वार्ड क्रमाक ७ मधुन कपिल मस्के तसेच विमल जोगदंड यांचा पराभव करून सौ. सिता बनसोड या मोठया मताधिक्याने निवडणून आल्या आणि नगराध्यक्ष पदावर विराजमान झाल्या. परंतु नगराध्यक्ष पदाचा प्रत्यक्षात कारभार मात्र हारुन इनामदार हेच पाहत असल्याची चर्चा शहारातील जनेतेकडून ऐकावयास मिळत आहे. तसेच केज विधानसभेच्या भाजपाच्या आमदार सौ. नमिता मुंदडा या मागासवर्गीय समाजातून येतात तसेच नगराध्यक्षा सौ.सिता बनसोड या देखील मागासवर्गीय समाजाच्या आहेत मात्र मागासवर्गीय वार्डाचा तसेच केज शहरातील विकासासाठी त्या उदासिन असताना पहावयास मिळत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे केज शहरात एकुण १७ वार्ड आहेत त्यापैकी वार्ड क्र. ७,९ व १६ मागासवर्गीय वार्ड म्हणून आरक्षीत आहेत. परंतु सदरील वार्डात घाणीचे साम्राज्य तसेच सत्ताधाऱ्यांची विकासासाठी उदासीनता दिसून येत आहे. त्यापैकी वार्ड क्र.१६ मध्ये नगरसेविका सौ. पल्लवी ओंमप्रकाश राजणकर या मोठया मताधिक्याने निवडणुन आल्या होत्या त्या निवडून आल्या मात्र त्यांना सत्ताधारी कसल्याच प्रकारे विश्वासात न घेता तथा मागासवर्गीय वस्तीत निधी न देता तसेच स्वच्छतेच्या संदर्भांने वार्डातील कामे सांगितले असता सत्ताधारी उदासिनता दाखवत असल्यामुळे वार्डात सर्वदूर दुर्गंधी , घाणीचे साम्राज्य परसले असल्याची प्रतिक्रिया दैनिक वादळ वार्ताच्या प्रतिनिधीशी बोलतांना त्यांनी दिली आहे. मात्र सदरील वार्ड क्र.१६ च्या समस्या डोके वरती काढत असल्यामुळे याकडे कॉग्रेसचे शहराध्यक्ष ताहेर खुरेशी यांनी प्रशासनास तथा सत्ताधाऱ्यास जागे करण्यासाठी आगळे-वेगळे अंदोलन उभे केले आहे. चक्क घाणीच्या व दुर्गंधीयुक्त ठिकाणी एक बॅनर लावले असुन त्यावर केज नगरपंचायत व यश कन्स्ट्रक्शन यांची नावे लिहुन या नावावर चंपालाचा हार घातला असुन जाहिर निषेध व्यक्त केला आहे. या अनोख्या पद्धतीने लावलेल्या बॅनरची चर्चा शहरात सर्वदुर होताना दिसत आहे.
सदरील लावलेल्या बॅनरमुळे केज नगरपंचायतचे सत्ताधारी तथा विरोधक जागे होतील का ? मागासवर्गीय वस्तीला न्याय मिळेल का ? नगसेविका सौ. पल्लवी ओंमप्रकाश राजणकर यांच्या मागासवर्गीय वस्तीतील कामे होतील का ? आदि प्रश्न शहरातील जनतेला पडली आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!