वादळवार्ता
सर्वांना अवगत आहे की, आपण सर्व मोबाईलचा वापर जास्त प्रमाणात करत आहोत…त्यातच internet सेवेचा पण वापर वाढलेला आहे आणि त्याचा उपयोग जसा चांगल्या कामा करिता करता येतो तसाच काही गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक हे गुन्हा करण्यासाठी त्याचा वापर करत आहे हे सुध्दा माहित आहे. तसेच Internet सेवेचा दुरुपयोग करून आपल्या थोड्या निष्काळजीपणामुळे/ आमिषापोटी बरेच गुन्हे घडत असल्याचे आपण नेहमी मीडिया मध्ये पाहत असतो तसेच त्यांना कालांतराने अटक झालेचे पण आपण पाहत आहोत. पण ही आर्थिक हानी होऊच नये आणि असे गुन्हे थांबण्यासाठी आपण स्वतः काळजी घेणे आवश्यक आहे. आपण गुन्हे थांबण्यासाठी स्वतः काळजी घेऊन गुन्हे प्रतिबंधची सुरुवात जर स्वतः पासून केली तर बरेच गुन्हे घडणार नाही त्या करिता आपण internet चा वापर करताना जास्त प्रमाणात खालील प्रमाणे पद्धत वापरून गुन्हेगार हे गुन्हे करत असतात..
जसे…..
1. काहीतरी कारण सांगून OTP नंबर विचारणे
2. लॉटरी किंवा कॅश बक्षीस जिंकले आहे असे सांगून
3.मित्राची ID तयार करून त्याचे नावाने पैसे मागणे
4. बँक खाते संबंधाने तुमचा मोबाईल प्रवेश साठी Link तयार करून व्हॉट्सॲप वर पाठवणे
5.कोणतेही कारण सांगून किंवा अकाउंट लॉक झाले आहे असे म्हणून UPI PIN विचारणे.
6.फेसबुक /इंस्टाग्राम/ट्विटर/व्हॉट्सॲप वर मैत्री करून अस्लील व्हिडिओ तयार करून खंडणी मागणे.
असे प्रकार घडत असल्याने आपण काळजी घेणे आवश्यक आहे..
👉 कोणालाही OTP नंबर देऊ नये.
👉 लॉटरी किंवा कॅश बक्षीस च्या अमिषाला बळी पडू नये.
👉 मित्राचे ID वरून पैसे ची मागणी झाली असल्यास खात्री केल्याशिवाय पैसे पाठवू नये.
👉 अनोळखी मोबाईल नंबर ने अथवा खात्री नसलेल्या नंबर ने link आली असल्यास खात्री केल्या शिवाय open (click) करू नये..
👉 UPI PIN कोणालाही देऊ नये.
वरील प्रमाणे आपण काळजी घेतल्यास* आपणास आर्थिक हानी होणार नाही.
तसेच असे गुन्हे घडणार नाही आणि अशा गुन्हेगारांना चाप बसेल… तरी जनतेने सतर्क राहावे असे अवाहन केज पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे सर यांनी केले आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!