आपला बीड जिल्हा

बप्पासाठी केज पोलिसांचे एक पाऊल पुढे : आता परवान्यासाठी पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नाही !

गणेशोत्सव निर्विघ्न साजरा करता यावा म्हणून आता थेट ऑनलाईन परवाना – सपोनि शंकर वाघमोडे
वादळवार्ता वार्तांकन – केज

गणेश मंडळांना गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडता यावा त्यांना तसूभर सुद्धा त्रास होऊ नये म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी पोलीस ठाणे हद्दीतील गणेश भक्तांना थेट ऑनलाईन परवाना देण्याची अभिनव संकल्पना राबविली आहे.

पोलीस ठाणे केज हद्दीतील सर्व गणेश मंडळ आणि त्यांचे अध्यक्ष, पदाधिकारी व नागरिकांना याना केज पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी कळविले आहे की, या वर्षी कुठल्याही निर्बंधाशिवाय गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. श्रीगणेशांच्या स्थापनेसाठी स्थानिक केज पोलीस प्रशासनाकडे ऑनलाईन अर्ज करून परवानगी घेणे आवश्यक आहे. परवाना घेण्यासाठी गणेश मंडळाचे अध्यक्ष

यांचा फोटो, आधार कार्ड, जागा मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र आणि धर्मादाय आयुक्त नोंदणी प्रमाणपत्र या सर्व कागद पत्रांसह

https://drive.google.com/file/d 1rFxbQ4TJg3rhyj7PhqP71k66gxexw94e/view?usp=sharing

यावर ऑनलाईन करून परवाना घेण्याचे आवाहन प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर श्रीराम वाघमोडे यांनी केले आहे.

केज पोलिसांच्या या अभिनव संकल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!