वादळवार्ता वार्तांकन – मुबशिर खातीब
केज येथील भाऊसाहेब पाटील अध्यापक विद्यालयाचे 2007 ते 2010 च्या दरम्यानच्या विद्यार्थी माजी विद्यार्थ्यांचा मित्र मेळावा केज येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाला कॉलेजचे प्राचार्य विजयजी शिनगारे सर तसेच प्राध्यापक चोले सर प्राध्यापक कळेकर सर आधी शिक्षक उपस्थित होते.
यावेळी प्रत्येक माजी विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये त्या ठिकाणी राहून आज वेळातला वेळ काढून विद्यार्थी मेळाव्याला हजेरी लावली होती प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व कॉलेजच्या जीवनातील प्रत्येकाने आपले अनुभव सांगितले आणि जीवन जगत असताना प्रत्येकाने जर यशस्वी राहीले तर नक्कीच माणूस जीवन यशस्वी जगेल असा या ठिकाणी प्रत्येक जणांनी आपल्या शब्दात मांडणी केली यशस्वी करण्यासाठी संयोजक म्हणून सोमा राऊत तसेच शेख शंमिम परमेश्वर बोबडे अक्षय सिरसट ,प्रदीप काळे, सुनील घुगे, प्रल्हाद राऊत, रामचंद्र गरबडे, मोतीराम तांबे, नागठाणे विश्वनाथ, गीते संजीवन, प्रमोद गीते, महेश कवडे, गीते संजीवन, रेवन खंदारे, गोरख ढाकणे , सचिन घोळवे आदी होते