केज । प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात महायुतीचे पारडे जड झाले असून,आमदार पंकजाताई मुंडे व भाजपाच्या माजी खासदार प्रीतमताई मुंडे त्यासाठी अहोरात्र कष्ट घेत असून,त्याच धर्तीवर केज विधानसभेच्या महायुतीच्या उमेदवार नमिता ताई मुंदडा यांच्या प्रचारार्थ आज दुपारी ठीक चार वाजून 30 मिनिटांनी केज तालुक्यातील बरड फाट्यावर आमदार पंकजाताई मुंडे यांची सभा आयोजित केल्याची माहिती नमिता ताई मुंदडा यांच्या प्रचार कार्यालयातून देण्यात आली आहे.
या बाबतची माहिती अशी की,भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदबार नमिता अक्षय मुंदडा यांच्या प्रचारार्थ आज शनिवार,दिनांक १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता बरड फाटा,केज येथे भाजपा राष्ट्रीय सचिव, लोकनेत्या आ.पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.या सभेसाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट), रिपाइं (आठवले गट) आणि महायुतीच्या घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते आणि मतदारसंघातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे अशी नम्र विनंती व आवाहन ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, युवा नेते अक्षय मुंदडा व केज विधानसभा मतदारसंघ भाजपा, महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!