केज विधानसभानिवडणुक

मागासवर्गीय वस्त्यानंमध्ये एकच सुर फक्त नमिता मुंदडा 

कार्यकर्त्यांनी केला एकच निर्धार...

केज । सचिन भालेराव

केज विधानसभा निवडणुकीत प्रचाराचे जस जसे दिवस जवळ येऊ लागले आहेत तस तसा प्रचाराचा जोर वाढत असताना दिसत आहे त्यातच केज शहरामध्ये भाजपाच्या उमेदवार नमिता मुंदडा यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसत आहे.

या बाबत वृत्त असे कि केज शहरामध्ये भाजपाच्या उमेदवार सौ. नमिता मुंदडा यांच्या प्रचारार्थ भीम नगर केज येथे शुक्रवार दिनांक १५ नोव्हेंबर रोजी केज तालुक्याचे जेष्ट सामाजिक कार्यकर्त नंदकिशोर मुंदडा ( काकाजी ) यांच्या प्रमुख उपस्थितीत, माननीय श्री बंडू मस्के ( रि पा ई युवक जिल्हा कार्याध्यक्ष बीड ) यांच्या नेतृत्वाखाली भव्य बैठकीचा आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमास विजय बापू केंद्रे, सुधाकर बापू लांब, प्रवीण देशपांडे, महादेवजी सूर्यवंशी, भीष्म हजारे, संजय मस्के, प्रेमजीत हजारे, प्रमोद मस्के व शेकडो महिला तरुण मित्र मंडळ हजर होते. यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी केज शहराचा व तालुक्याचा विकास केला त्या सौ.नमिता मुंदडाना भरघोस मतांनी निवडून आनु असे कार्यकर्त्याच्या वतीने अश्वासीत केल्या नंतर सदरील बैठकीचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला . सदरील बैठकीच्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने कार्यकर्ते तथा शेकडो महिला तरुण मित्र मंडळ हजर होते.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!