आपला जिल्हाक्राईम

बेपत्ता युवकाचा मृतदेह मांजरा नदीत सापडला ; आत्महत्या की खून नातेवाकानी व्यक्त केली शंका !             

वादळवार्ता – गौतम बचुटे

अंबाजोगाई येथील चनई मधून दोन दिवसां पासून बेपत्ता असलेला २७ वर्षीय तरुण पवन रामराव गोचडे याचा मृतदेह कळंब पोलीस ठाणे हद्दीत मांजरा नदीच्या  पाण्यात आढळून आला आहे.

या बाबतची माहिती अशी की, अंबाजोगाई जवळील चनई येथून पवन रामराव गोचडे हा दोन दिवसा पासून बेपत्ता झाला होता. या बाबत त्याच्या नातेवाईकांनी दि. ८ मार्च रोजी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्राइ नोंद करण्यात आली होती. दरम्यान दि. ९ मार्च रोजी दुपारी ४:०० वा च्या सुमारास मासे धरणाऱ्या लोकांना केज-कळंब रस्त्यावरील मांजरा नदीच्या पुलाजवळ प्रेत तरंगत असताना आढळून आले. कळंब पोलिसांनी सदर प्रेत पाण्याबाहेर काढून त्याची ओळख पटविण्यासाठी अंबाजोगाई पोलिसांच्या मदतीने बेपत्ता युवकांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून ओळख पटविण्यासाठी नातेवाईकांना बोलावून घेतले असता हा मृतदेह पवन गोचडे याचा असल्याची ओळख पटली असून सदर मृतदेह हा चनई ता. अंबाजोगाई येथील पवन रामराव गोचडे वय (२७ वर्ष) याचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पिंगनवाड, पोलीस नाईक कोळेकर, पोलीस नाईक गायकवाड यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन व उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवीला आहे.

सदर बेपत्ता प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सुरकुंडे हे तपास करीत आहेत.

मयताचा रिक्षा मांजरा पुलावर आढळल्याने पोलिसांना संशय होता 

चनई ता अंबाजोगाई येथून बेपत्ता असलेला युवक पवन गोचडे याचा रिक्षा दि. ८ मार्च रोजी बेवारस स्थितीत आढळून आला होता.

नातेवाईकांना संशय

मयत पवन गोचडे याच्या प्रेताची ओळख पटविणाऱ्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून पवनचा घात झाला असावा असा संशय पोलीस अधिकाऱ्याकडे व्यक्त केला आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!