आपले केजशिक्षण

वसुंधरा माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालयात केला भारतीय सैनिकांचा सन्मान

वादळवार्ता / केज

वसुंधरा माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय पैठण मध्ये आज आझादी का अमृत महोत्सव- हर घर तिरंगा उपक्रम अंतर्गत व भारतीय स्वातंत्र्य दिनी शालेय परिसरातील सेवानिवृत्त होऊन आलेले व 1971 च्या लढाईमध्ये प्रत्यक्ष सहभागी झालेले मेजर भागवत पवार साहेब यांचा विद्यालया मध्ये गौरव करण्यात आला.

    सकाळी विद्यालयातून प्रभात फेरी काढण्यात आली.प्रभात फेरीमध्ये चिरंजीव अर्थव देशमाने इयता ६वी यानी महात्मा गांधींची साकारलेली वेशभूषा हे संपूर्ण पैठण वाशीयांचे आकर्षण ठरले.मुख्याध्यापक सुशीलकुमार गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर पैठण परिसरातील भारतीय सेनेत सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले सैनिकांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी मेजर भागवत पोळ पैठण, विक्रम चौधरी साहेब व्यंकट चौधरी साहेब, परशुराम नाना चौधरी साहेब पैठण,महादेव पवार साहेब पाथरा ,संभाजी मस्के साहेब सावळेश्वर, भाऊसाहेब पवार साहेब सावळेश्वर, ज्ञानेश्वर चौधरी पैठण इत्यादी सैनिक कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून परमेश्वर अण्णा चौधरी , हनुमंत चौधरी प्राध्यापक रामधन , प्रकाश गिरी व परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यावेळी विद्यालयात घेण्यात आलेल्या बीएसआय क्लब आयोजित पोस्टर स्पर्धा सर्वप्रथम कु.पूर्वजा चौधरी – समिक्षा जगदाळे, सर्व द्वितीय कु.वैष्णवी हांडिबाग- श्रद्धा हांडिबाग या विजेत्यांचे ट्रॉपी व पुष्पगुच्छ देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. मुख्याध्यापक सुशीलकुमार गायकवाड यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक हनुमान चौधरी सर यांनी केले स्वागत गीत प्राध्यापक प्रसाद कुलकर्णी सर व त्यांच्या टीम ने सादर केले.आभार प्रदर्शन श्री लोकरे दीपक सरांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक चौधरी सर,नवनाथ गायकवाड सर,श्रीमती तोडकर मॅडम, श्रीमती दीपमाला डाके मॅडम,अतुल साखरे सर, अमित शिनगारे सर, मनोज बारसागडे सर, अनिल सरवदे सर, मनोज शिनगारे सर, उत्तरेश्वर चौधरी, अशोक गायकवाड ,संभाजी सोनवणे,कुंदन मस्के, शशिकांत पवार सर इत्यादीने प्रयत्न केले.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!