आपला बीड जिल्हा

नेकनुर बसस्थानकाच्या परिसरात खड्डे आणी चिखल ; प्रवाशी बेजार,एसटी चालकाचे हाल

वादळवार्ता वार्तांकन – शेख शाकेर

सर्वत्र सिमेंट रस्ते मात्र नेकनुर बस्थानकात खड्डे आणी चिखल ; प्रशासनाचे दुर्लक्ष

सविस्तर वृत्त असे कि बीड जिल्हयातील नेकनुर बसस्थानकाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे . तशी चर्चा करण्यासारखाच विषय आहे कि नेकनुर गावमधुन सिमेंट कॉंक्रीट चा राष्ट्रीय महामार्ग जातो .

परंतु याच महामार्गावरती असणारे बसस्थानक त्या समोर असणारे खड्डे त्याबरोबरच चिखल यामुळे येथुन प्रवास करणारे प्रवासी यांना चिखलातुन वाट काढत , खड्डे चुकवत बसस्थानाकात ज्या त्या गावाकडे जाण्यासाठी बसची वाट पाहवी लागत आहे. मात्र येथील एसटी महामंडळ प्रशासन व ग्रामपंचायत यांचे मात्र या बाबीकडे दुर्लक्ष होतं असताना दिसत आहे.

बसस्थानकातील परिसर स्वच्छ हाईल का ? परिसरातील खड्डे , चिखल यांचा बंदोबस्त होईल का असे विविध प्रश्न येथील नागरीकांना तसेच प्रवाशांना, चालकांना पडले आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!