आपला बीड जिल्हाआपले केज

पवनराजे इंग्लिश स्कुल केज येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

वादळवार्ता वार्तांकन – केज

सावित्रीच्या लेकींचा उस्फूर्त प्रतिसाद

सविस्तर वृत असे कि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 192 वी जयंती पवनराजे इंग्लिश स्कुल केज येथे हर्षउल्हासाच्या वातावरणामध्ये साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला इयत्ता नववी मधील विद्यार्थ्यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरती तथा त्याच्या कार्यावरती प्रकाश टाकत तसेच पवनराजे इंग्लिश स्कुल केज तथा कै. राम चौरे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व अध्यापिका यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमामध्ये आकर्षक म्हणजे सवित्रीबाई फुले यांचा सारखा पोषाख परिधान करून आलेल्या सर्व विद्यार्थीनींनी लक्ष वेधले. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख घाडगे मॅडम यांनी केले

सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विदिशा गायकवाड , साक्षी चौरे यांनी केले तर आभार स्नेहा मॅडम यांनी मानले .

या कार्यक्रमास शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी तथा विद्यार्थी उपस्थित होते.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!