आपले केज

केज शहरात भीम जन्मोत्सवाची तयारी जोमात, भव्य बॅनर आकर्षणाचा केंद्रबिंदू

केज । प्रतिनिधी

केज शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी भव्य बॅनर झळकू लागले आहेत. सामाजिक संघटना, भीमसैनिक आणि युवक मंडळांकडून शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि वसाहतींमध्ये आंबेडकरी चळवळीचा जागर करणारे बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र यामध्ये फुले नगर येथील भीम जन्मोत्सवाने एक आकर्षक बॅनर लावून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे .

या बाबत सविस्तर वृत्त असे कि केज शहरामधील फुले नगर येथे भिम जन्मोत्सवास २५ वर्ष पूर्ण होत असल्यामुळे रोप्यमहोत्सवी वर्ष साजरा करत असताना भिमजन्मोत्सवाचे अध्यक्ष निखिल समुद्रे,सचिव निखिल गायकवाड व कार्यकारीणी च्या वतीने जोरदार तयार करत दि ६ एप्रिल पासुन ते १४ एप्रिल पर्यंत बहुसंख्य प्रबोधन,गितांचे, स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे.त्यामध्ये सुरुवातीलाच आकर्षक ठरत आहे ते १० x ६० चे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य बॅनर . सदरील बॅनरवर डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे वेगवेगळया स्वरूपाचे प्रतिमा व संदेश लावल्यामुळे हे बॅनर आकर्षणाचा केद्रबिंदु ठरले आहे.विशेष म्हणजे या बॅनरवर कोणत्याच पदाधिकारी वा कार्यकर्त्याचा फोटो नाही.

भीमजन्मोत्सावा निमित्ताने दि ६ . एप्रिल ते १४ एप्रिल पर्यंत भरघोस कार्यक्रमाचे आयोजन केले असल्यामुळे सदरील कार्यक्रमास केज तालुक्यातून वा शहरातून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

निखिल अंगद समुद्रे

अध्यक्ष भिमजन्मोत्सव फुले नगर

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!