आपला बीड जिल्हा

केज तालुक्यातील ग्रामीण भागातील खराब झालेल्या रस्त्यांना तात्काळ प्रशासकीय मंजुरी देऊन नव्याने काम चालू करावे अन्यथा नऊ आॕगष्टला रास्तारोको आंदोलन करणार

कुलदिप करपे

वादळवार्ता वार्तांकन – शाहेद खतीब

केज तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते गेल्या बारा वर्षापासून मोठमोठे खड्डे पडून अतिशय खराब झाले आहेत. या रस्त्यांना तात्काळ प्रशासकीय मंजुरी देऊन नव्याने काम चालू करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी दि.९ ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी छत्रपती शिवाजी महाराज चौक केज येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते गेल्या बारा वर्षापासून खड्डे पडून खराब झाले आहेत. याकडे लोकप्रतिनिधीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्यामुळे काही प्रमुख रस्ते मोठ-मोठे खड्डे पडून अतिशय खराब झाले आहेत. जवळबन, आवसगाव, बोरी सावरगाव,पावन धाम, सावळेश्वर,आणी उमरी रोड केज या गावातील प्रमुख रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर झाली होते. मात्र कोरोना महामारी रोगप्रतिबंधक उपाय करण्यासाठी सदर रस्त्याचा निधी वळवून सदरील रस्त्याचे काम रद्द करण्यात आले होते.

अनेक वेळा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संबंधित रस्त्याबाबत पाठपुरावा करून देखील संबंधित विभागाने याबाबत कसल्याच प्रकारची कारवाई केली नाही.ग्रामीण भागातून शहराकडे या रस्त्याने दळणवळण करताना नागरिकांना, विद्यार्थ्यांना, गर्भवती महिला,शेतकरी बांधव,आजारी रुग्णांना, आणी वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.त्यामुळे शासनाने याची दखल घ्यावी अन्यथा नउ आॕगष्टला रास्तारोको आंदोलन करण्याचा ईशारा श्री.कुलदीप करपे यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!