केज । सचिन भालेराव
तरुण मुलाच्या अपघाती मृत्यूने व्यथित झालेल्या कुटुंबाने त्याच्या स्मरणार्थ शेतात भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाची प्रतिकृती उभारून त्याची स्मृती कायम ठेवली आहे.केज तालुक्यातील के ज येथील २५ वर्षाचा युवक निपुण भालेराव हा माहिती व तंत्रज्ञान विषयात बी-टेक्च्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. त्याचे वडील प्रा. धनंजय भालेराव हे श्याम वरिष्ठ महाविद्यालय दहिफळ वडमाउली येथे वनस्पती शास्त्राचे प्राध्यापक आहेत. तर आई दैवशाला सिरसट (भालेराव ) या गणेश माध्यमिक विद्यालय तांबवा येथील शाळेत माध्यमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.सन २०२३ मध्ये चि. निपुण भालेराव यांच्या मोटार सायकलचा बीडच्या घाटात अपघात झाला होता. त्या अपघातात उपचारा दरम्यान दिन २१ सप्टेंबर २०२२ रोजी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.दरम्यान कालकथित निपुण भालेराव याची आठवण कायम राहण्यासाठी त्याच्या आई-वडिलांनी माळेगाव येथे शेतात भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाचे प्रतिकृती असलेले स्मारक उभारून स्मृती कायम ठेवल्या आहेत. कालकथित निपुण भालेराव हा नियमितपणे भीमा कोरेगाव येथील शौर्य दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत असे.आंबेडकरी विचार व चळवळीचा त्याला अभिमान होता.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!