केज पोलीस ठाणे हद्दीतील दैठणा, माळेवाडी येथे अवैध दारू विक्री सुरू असलेल्या तीन ठिकाणी छापे ….
वादळवार्ता वार्तांकन – महादेव काळे
केज तालुक्यातील माळेवाडी व दैठणा येथे तीन ठिकाणी अवैध दारू अड्ड्यावर छापे मारुन देशी-विदेशी दारु जप्त करुन पाच जणांवर केज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. दोन आरोपी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक यांचे जनसंपर्क अधिकारी एपीआय विलास हजारे यांनी शनिवारी ( दि. ६ ) सायंकाळी साडेपाच ते आठ वाजण्याच्या दरम्यान केली.
पोलीस अधिक्षक यांच्या आदेशावरून जनसंपर्क अधिकारी एपीआय विलास हजारे यांनी केज पोलीस ठाणे हद्दीतील दैठणा, माळेवाडी येथे अवैध दारू विक्री सुरू असलेल्या तीन ठिकाणी छापे मारले. यामध्ये येथे देशी-विदेशी दारुचा साठा मिळून आला. एकूण ३७ हजार ९०५ रू. मुद्देमाल जप्त केला. यामध्ये वेगवेगळे तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून, विजय नरहरी कातमांडे रा. दैठणा, विकास नारायण जाधवर रा.माळेवाडी, उमेश नारायण जाधवर रा. माळेवाडी, कल्याण गुलाब गिरी, विष्णू मारुती शिंदे (सर्व राहणार माळीवाडी ) असे संशयित आरोपींची नावे आहेत. यातील दोघांना घटनास्थळी ताब्यात घेतले आहे. सदरील कारवाई एपीआय विलास हजारे, पोलीस कॉन्स्टेबल वनवे,राख, गायकवाड, काकडे, चव्हाण, कडु यांनी केली आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!