Uncategorized

भरपावसात बजरंग सोनवणे यांच्या कार्यकर्त्यांची मंत्री धनंजय मुंडे यांच्या स्वागतासाठी अलोट गर्दी

वादळवार्ता – केज

महाराष्ट्राचे नवनिर्वाचित कॅबीनेट मंत्री ना.धनंजय मुंडे यांची राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झाल्यानंतर ते प्रथमच बीड जिल्ह्य़ाच्या दौर्‍यावर असताना केज तालुक्याचे नेते तथा येडेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन बजरंग सोनवणे यांच्या पवनसुत निवासस्थानी सत्काराचे आयोजन केले होते.

सदरील सत्कारच्या अनुशंगाने केज तालुक्यातील बजरंग बप्पा सोनवणे यांचे कार्यकर्ते तथा केज तालुक्यातील मतदार मोठ्या संख्येने भर पावसात उपस्थित होते.मंत्री धनजंय मुंडे यांचे ठिक ६ वाजता पदार्पण झाल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत ढोल ताश्यांच्या गजरात तथा असंख्य कार्यकर्त्याच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी बजरंग सोनवणे यांची प्रकृती ठिक नसतानाही केज तालुक्यातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!