गौतम बचुटे/केज
केज येथे मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने मूकनायक दिन साजरा करण्यात आला.
या बाबतची माहिती अशी की, केज येथे मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दि. ३१ जानेवारी १९२० रोजी मूकनायक नावाचे पाक्षिक सुरू केले होते. त्या निमित्त केज येथील पत्रकार बांधवांनी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने केज येथील शासकीय विश्रामगृह येथे मूकनायक दिन साजरा केला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे होते. तर कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून जेष्ठ पत्रकार प्रा. हनुमंत भोसले, शिवदास मुंडे, मराठी पत्रकार परिषदेचे विजयराज आरकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी बोलताना पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्य घटनेमुळेच देशातील सर्व नागरिकांना समान संधी प्राप्त झालेली असून त्यांनी त्यांच्या मूकनायक या पाक्षीकातून उपेक्षितांच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. त्या काळात वृत्तपत्र सुरू करणे आणि चालविणे खूप अवघड काम असतानाही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ते पेलले, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याव राज्यघटनेमुळेच देश एकसंघ असळताचे त्यांनी सांगितले. प्रा. हनुमंत भोसले, मराठी पत्रकार परिषदेचे विजयराज आरकडे, दै.वादळ वार्ताचे मुख्य संपादक अजय भांगे व गौतम बचुटे यांनी मूकनायक पाक्षिक आणि मूकनायक दिनाच्या संदर्भात मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला अशोक सोनवणे, धनंजय कुलकर्णी, दै. वादळवार्ताचे संपादक रमेश गुळभिले, सुहास चिद्रवार, शेख इकबाल, संतोष गालफाडे, महादेव गायकवाड, सन्नी शेख, बाबा मस्के, श्रीराम तांदळे, अक्षय गित्ते, बाळासाहेब जाधव, अजीम ईनामदार, ज्योतिकांत कलसकर, यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार अजय भांगे यांनी तर सुत्रसंचलन व आभार गौतम बचुटे यांनी व्यक्त केले.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!