वादळवार्ता वार्तांकन – मुबशीर खतीब
केज शहारामधील बीड रोड लगत असणारे बजरंग नगर , रमाई नगर येथील नागरीकांचे तथा आजुबाजुला असणाऱ्या तीन शाळेतील शालेय विद्यार्थांचे आरोग्य घनकचरा व्यवस्थापनातील डेपो मुळे धोक्यात येत असतानाचे चित्र समोर दिसत आहे .
सविस्तर वृत्त असे कि केंद्र शासन , राज्य शासन यांनी वेळोवेळी कचरा विघटन, कचरा डेपो करण्याच्या द्रष्टीने वारंवार सुचना केल्या आहेत . त्याबरोबर पाठीमागे प्रांत अधिकारी म्हणुन केज येथे आलेले आमदार सुरेश धस यांनी केज नगर पंचायतच्या कर्मचार्याची तहसिल कार्यालयामध्ये बैठक घेऊन ” कचरा डेपो कोणत्याही वस्ती शेजारी असु नये वा तसे करू नये अशा स्वरुपाच्या सुचना केज नगरपंचायत प्रशासनास केल्या होत्या.
प्रामुख्याने घनकचरा डेपोमध्ये विविध विषारी पदार्थांचे संचयन होत असतात . नैसर्गिक चक्रात बदल होऊन प्राणी आणि झाडांमध्ये विष संचयन होते आणी महत्त्वाचे म्हणजे तेथे राहणाऱ्या लोकांना वेगवेगळ्या स्रोतातून विष संचयन होऊन त्यांचे शरीरावर विविध प्रकारचे परिणाम होतात .
असे असताना देखील केज नगरपंचायतचे प्रशासन भरवस्ती असलेल्या बजरंग नगर , रमाई नगर येथील भटके विमिक्त , दलित कष्टकरी श्रमजीवी लोकांच्या अरोग्याची काळजी न करता त्यांचे आरोग्य सर्व माहित असताना धोक्यात घालण्याचा प्रयत्न करत आहे व कचरा डेपो आहे त्या ठिकणी ठेवुन त्यामध्ये मोठ मोठे कचरा विघटन यंत्र बसवत असताना दिसत आहेत .
बीड रोड लगत असणारे बजरंग नगर , रमाई नगर मोठी लोकसंख्या असणार्या वसाहती आहेत परंतु यांचा विचार फक्त मतदाना पुरताच होतो . मात्र येथील जे उद्याच्या भारताचे भविष्य असणारी लहान मुलं, विद्यार्थी त्याबरोबर येथील सर्व भटके विमुक्त ,दलित कष्टकरी, श्रमजीवी लोकांना श्वसनाच्या विकारांना, त्वचा विकारांना , विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे .
केंद्र शासन , राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या सुचना , आदेशानुसार केज नगरपंचायत प्रशासनाने काम न करता ” लगे रहो ” अशी भूमीका घेतली तर होणाऱ्या आरोग्य आपत्तीची जिम्मेदारी केज नगरपंचायत प्रशासनाची असेल अशीच चर्चा केज शहरात होताना दिसत आहे .
________________________
केंद्र शासन , राज्य शासन यांनी वारंवार सुचना देऊनही केज सत्ताधारी मनमानी कारभार करत असतील तर याला हुकुमशाहीच म्हणावी लागेल . याच प्रकारची मनमानी इतर विषयात पण चालु आहे . या विषयावर विरोधीपक्ष गप्प का ? सर्वसामान्य नागरीकांचे आरोग्य धोक्यात घालण्याचा कोणालाच अधिकार नाही ते असंविधानीक आहे .
अजहर इनामदार
नगसेवक नगरपंचायत केज
________________________
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!