केज | प्रतिनिधी
शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांशी कथितरित्या शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या निषेधार्थ केज तालुक्यातील विविध पत्रकार संघटनांनी तहसीलदारांना निवेदन देत तीव्र संताप व्यक्त केला.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पत्रकारांशी अशोभनीय भाषा वापरून धमकी देणे हे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर थेट आघात असून, या प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच संजय दिना पाटील यांची खासदारकी कायमस्वरूपी रद्द करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
पत्रकार संघटनांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले आहे की, या प्रकरणात त्वरित आणि कठोर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. पत्रकारांवरील धमक्या आणि दडपशाही सहन केली जाणार नाही, असा ठाम इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी पत्रकार श्रावण कुमार जाधव, पत्रकार रामदास साबळे, पत्रकार गौतम बचुटे, पत्रकार हनुमंत सौदागर, पत्रकार संतोष गालफाडे, पत्रकार महादेव गायकवाड, पत्रकार अशोक सोनवणे, पत्रकार विजय आरकडे, पत्रकार प्रकाश मुंडे, दैनिक वादळ वार्ताचे संपादक अजय भांगे, पत्रकार चंद्रकांत पाटील, पत्रकार रंजीत घाडगे, पत्रकार तात्या गवळी, पत्रकार प्रदीप गायकवाड, पत्रकार पांडुरंग कसबे, पत्रकार वसंत सोनवणे, पत्रकार दिनकर जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!