केज विधानसभा

नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष अमर भैया पाटील यांचा सर्वपक्षीय सत्कार

केज । प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या केज तालुकाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती झालेले तरुणांचे लाडके नेते अमर (भैया) पाटील यांचा सर्वपक्षीय मित्रपरिवाराच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात उपनगराध्यक्ष पशुपती दांगट, माजी नगराध्यक्ष कबीर (भाई) इनामदार, माजी उपनगराध्यक्ष दलित (भाई) इनामदार, नगरसेविका अरुणा गुंड, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ठोंबरे, सरपंच मुकुंद (मामा) कणसे, भाजपचे समीर देशपांडे, माजी नगरसेवक कपिल मस्के, पत्रकार विनोद शिंदे, माजी ग्रामपंचायत सदस्य मुज्जू खुरेशी, दिनकर पवार सर, मुन्ना ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.

अमर पाटील यांनी सर्वसामान्य जनतेच्या आणि आठरापगड जातीच्या हितासाठी सातत्याने कार्य केले असून, त्यांच्या नेतृत्वामुळे तालुक्याला नवे दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी सर्वांनी व्यक्त केला. या वेळी सत्कारप्रसंगी प्रतिक्रिया व्यक्त करताना अमर (भैया) पाटील म्हणाले, “तालुकाध्यक्षपद ही जबाबदारी माझ्यासाठी सन्मानासोबतच कामगिरीचीही संधी आहे. मी आजपर्यंत सर्वसामान्य जनतेसाठी आणि तरुणांसाठी काम केले असून, यापुढेही कोणताही भेद न करता सर्व जाती-धर्माच्या जनतेसाठी पारदर्शक व विकासाभिमुख काम करणार आहे. पक्षाचे नेते खा. सुनिल तटकरे साहेब, आ. धनंजय मुंडे साहेब यांनी दाखवलेला विश्वास मी कृति‏शील कामगिरीने सार्थ ठरवेन. राजकारण हे प्रतिष्ठेचे नव्हे तर जनसेवेचे माध्यम आहे, हे मी कधीही विसरणार नाही.”

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!