आपला बीड जिल्हा

ज्येष्ठ पत्रकार नागनाथ जाधव यांना भर पावसात शोकाकुल वातावरणात साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

वादळ वार्ता प्रतिनिधी बीड

 

साप्ताहिक लोक जगतचे संपादक, दैनिक लोकपत्रचे बीड जिल्हा प्रतिनिधी, दैनिक लोकसत्ताचे प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे बीड जिल्हा उपाध्यक्ष नागनाथ व्यंकटराव जाधव यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मंगळवार दिनांक 12 जुलै 2022 रोजी मध्यरात्री दरम्यान दुःखद निधन झाले. ते नांदेड जिल्ह्यातील जाकापूर तालुका कंधार येथील मूळ रहिवासी होते. त्यांच्या पार्थिवावर बुधवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 1.30 वाजता मोठ्या मुलीने अग्नीडाग दिला.भगवान बाबा प्रतिष्ठान जवळील वैकुंठधाम स्मशानभूमी, बीड येथे भर पावसात शोकाकुल वातावरणात साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.त्यांच्या पार्थिवावरील अंत्यसंस्कारास वृत्तपत्रसृष्टीसह सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ज्येष्ठ संपादक, पत्रकार नागनाथ जाधव यांचे काही दिवसापूर्वी छातीत दुखू लागल्याने एन्जोप्लास्टी सर्जरी करण्यात आली होती. त्यानंतर ते व्यवस्थित होऊन कार्यरत झाले होते. मात्र तेव्हापासून त्यांना पूर्वीप्रमाणे तब्येत साथ देत नव्हती. काही दिवसांपूर्वी ताप आली होती. डॉक्टरांनी कावीळ झाल्याचे निदान केले होते, मात्र त्यातून ते सावरले होते. मंगळवार दिनांक 12 जुलै रोजी ते दैनिक लोकसत्ता कार्यालयात नेहमीप्रमाणे आले. सर्व कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारी केल्या. सर्वांशी हसून खेळून बोलून ते नेहमीप्रमाणे दुपारी घरी गेले. दिवसभर पाऊस असल्याने ते दुपारनंतर घरीच थांबले. सायंकाळी जेवण करून झोपी गेले. रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान त्यांना अचानक छाती त्रास होऊ लागला. वेदना असह्य झाल्या, घरीच उलटी देखील झाली. दरम्यान त्यांना कुटुंबीयांनी तात्काळ दीप हॉस्पिटल येथे दाखल केले.डॉक्टरांनी उपचार सुरू केले मात्र त्यांनी कसलाही प्रतिसाद दिला नाही. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणजोत मालवली होती. त्यांच्या पश्चात पत्नी सुभद्रा नागनाथ जाधव ,मोठी मुलगी सौ. वर्षा दीपक डावकर, दुसरी मुलगी सौ.महानंदा चेतन इंगोले आणि सर्वात लहान मुलगी मानसी नागनाथ जाधव असे कुटुंब असून त्यांच्या पश्चात आई श्रीमती चौत्राबाई वेंकटराव जाधव, मोठी बहीण ममता गोपाळराव हंबर्डे, सौ मंगलबाई धोंडगे, सौ राणीबाई श्रीनिवास जाधव, तसेच लहान भाऊ विलास, प्रकाश आणि गोपाळ व्यंकटराव जाधव असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर बार्शी रोडवरील भगवान बाबा प्रतिष्ठान जवळ असलेल्या वैकुंठधाम स्मशानभूमीमध्ये शोकाकुल वातावरणात बुधवार दिनांक 13 जुलै 2022 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मोठ्या मुलीने त्यांच्या पार्थिवाला अग्नीडाग दिला. अंत्यविधीस प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडियातील सर्व प्रतिष्ठित संपादक, पत्रकार, कर्मचारी वृंद तसेच जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांनी शोक संदेश पाठवून जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने गजानन शिंदे आणि कांडेकर यांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. या प्रसंगी राष्ट्रवादीच्या माजी आमदार उषाताई दराडे आपल्या शोक संदेशात म्हणाल्या, दोन वर्षांपूर्वी प्रेस फोटोग्राफर महेश जोशी आणि आता नागनाथ जाधव यांच्या अकाली मृत्यूने मी माझ्या दोन मुलांना गमावले आहे. नागनाथ एक सुस्वभावी आणि विश्वासू व्यक्तिमत्त्वाचा होता. त्याच्या अकाली मृत्यूने वृत्तपत्रसृष्टीसह दराडे कुटुंबीयांवर देखील मोठा आघात झाला आहे. याप्रसंगी सामाजिक नेत्या सुशीलाताई मोराळे म्हणाल्या, नागनाथ जाधव सारखे प्रामाणिक आणि निष्ठावंत पत्रकार कर्मचारी बोटावर मोजणे एवढे आहेत. जाधव यांच्या अकाली निधनाने वृत्तपत्रसृष्टीसह सामाजिक चळवळींची मोठी हानी झाली आहे. याप्रसंगी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे म्हणाले, मागील 24 वर्षापासून नागनाथ जाधव हा माझा केवळ कर्मचारी नसून कुटुंबातील एक सदस्य झाला होता. अत्यंत विश्वासू ,सकारात्मक दृष्टी आणि कायम हसमुख असलेल नेतृत्व मी आज गमावले आहे. कदाचित माझी पुण्याई होती म्हणून मला नागनाथ जाधव सारखा सहकारी मिळाला. ही उणीव कधीही भरून निघणार नाही. याप्रसंगी पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी श्रद्धांजली अर्पण करून बीडचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पाठवलेल्या शोक संदेशाचे वाचन केले. पत्रकार नागनाथ जाधव कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई परिवार सहभागी आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!