आपला बीड जिल्हाआपले केज
केज नगरपंचायतचा कारभार अंधारात; तब्बल १३ महिन्यांनी दिले पत्राला उत्तर

अनं पथदिव्यांना नाही प्रकाश
वादळवार्ता /केज
महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाच्या माध्यमातुन राष्ट्रीय महामार्गाचे मजबुतीकरण रुंदीकरणाचे काम मागील ३ वर्षा पासुन कासवगतीने सुरू आहे. डांबरीकरण होते तेव्हा आपघाताचे प्रमाण अतिशय कमी होते परंतु सिमेंट क्रॉक्रीटचे रस्ते झाल्या पासुन हे प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. रस्त्याचे काम करताना एच पी एम कंपनी आणी मेघा कंपनीने कामामध्ये स्टीलचा वापर न केल्यामुळे रस्ते जागोजागी फाटत असुन त्याला तडे गेले आहेत तर बहुसंख्य ठिकाणी रस्त्याच्या बाजुने असणारे नाले , फुटपाथ अजुन पर्यंत केलेलेच नाही. रस्ता आबड धोबड केल्यामुळे जागोजागी जंपीग झाल्यामूळे आपघाताचे प्रमाण वाढले आहे. असे असताना केज शहरामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या मधोमध पथदिवे बसवले आहेत
महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाच्या वतीने केज नगरपंचायतला दि २३ में २०२२ रोजी जाक्र.२०२२/ मरारविममर्या/ रा.म,-५४८सी/३५४ पथदिव्यांच्या हस्तांतरणाचे पत्र पाठविले होते. परंतु केज नगर पंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे सदरील पत्राकडे सपशेल दुर्लक्ष करूण केज शहरातील नागरीकांना अंधारात ढकलण्याचा प्रयत्न केला गेला आहे असेच दिसुन येत आहे. यामध्ये कर्मचारी यांचा दोष नसुन सत्ताधारी विकास कामांचा पाठपुरावा करण्यास कमी पडत असल्याचे चित्र दिसत आहे.
आज सदरील पत्राची केज नगरपंचायतला आचानक जाग आली आणी तब्बल १३ महिन्यानी म्हणजेच २० जुन २०२३ रोजी पत्रव्यवहार करण्यास सुरुवात करुण पथदिव्यांच्या क्वालीटी व मुदतीचा या पत्राव्दारे बोध होत नाही असे जाक्र.२०२३/ वि.वि /८८७ चे पत्र पाठवून कळविण्यात आल्यामुळे केज शहरातील नागरिकांची सत्ताधार्यानां व प्रशासनास किती काळजी आहे हे यावरून दिसुन येते.
तीन वर्षापासुन राष्ट्रीय माहमार्गावरील पथदिवे रस्त्याच्या कामामुळे बंद असुन आता पथदिवे बसविलेले असताना पथदिव्यांच्या विकासाचा प्रकाश मात्र केज नगरपंचायतच्या कारभारामुळे अंधारात गेला आहे कि काय ? अशीच जोराची चर्चा केज शहरातील नागरीकानं मध्ये होत आहे.
केज नगरपंचायत मध्ये नेमके काय चालले आहे याचा कांही ताळमेळच लागत नसुन एकुण पाच बैठकी झाल्या परंतु कुठल्याच बैठकीत राष्ट्रीय महामार्गांच्या पथदिव्यांचा पश्न उपस्थित केला नाही वा पत्र देखील आलेले कळवले नाही. परंतु सदरील बाबीकडे तात्काळ लक्ष देऊन लवकरच हस्तातंराची प्रक्रिया पुर्ण केली जाईल.
सौ.शितलताई दांगट
उपनराध्यक्ष न.प. केज



