वादळवार्ता वार्तांकन – गोतम बचुटे
केज घराचे बांधकाम सुरू असताना एका बांधकाम मजुराला विजेचा शॉक लागला आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज येथील केज-कळंब रोड जवळ एका घराचे बांधकाम चालू असून सोमवार दि. २६ डिसेंबर रोजी सकाळी ९:३० वा. च्या दरम्यान बांधकाम करीत असलेले रुद्रेश शेलार वय (४० वर्ष) या बांधकाम मजुराला बांधकाम सुरू असलेल्या घरावरून गेलेल्या ३३ के व्ही विज वाहक ताराचा स्पर्श होऊन त्याला शॉक लागला आहे. विजेच्या शॉकमुळे त्याच्या हाताला भाजले असून त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालय केज येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय येथे हलविण्यात आले आहे.
दरम्यान या घरावरून गेलेल्या वीज वहिनी हटविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.