आपला बीड जिल्हाशेतकरी

केवड, येथे कापूस उत्पादक्ता वाढ शेतकरी प्रशिक्षण संपन्न.

कृषी विभागाकडून गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाचे मार्गदर्शन

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

सध्या कृषी क्षेत्राला विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक पीक पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन उपविभागीय तंत्रज्ञान समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी कृषी विभागामार्फत आयोजीत राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजने अंतर्गत प्रशिक्षण प्रशिक्षण कार्यक्रमात केले.

गतवर्षी कापसावर गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते तशी परिस्थिती या वर्षी होऊ नये याकरिता शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी कृषी सहाय्यक नितीन पाटील यांनी गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन शेतकरी प्रशिक्षण आयोजन केले.

सदर शेतीशाळेमध्ये येळकर यांनी शेतकऱ्यांना रासायनिक कीटकनाशकांचा व खतांचा बेसुमार वापर केल्यामुळे उत्पादन खर्चा मध्ये होत असलेली वाढ आणि कृषी परिसंस्थेचा होत असलेला ऱ्हास विस्तृतपणे समजावून सांगितला. उत्पादन खर्च कमी करून कीड रोग अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्यासाठी एकात्मिक पद्धतीचा वापर करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.

घरच्या घरी चिकट सापळे तयार करून शेतामध्ये लावल्यास त्यापासून रस शोषक किडींचा बंदोबस्त करता येईल याची माहिती दिली.

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी व जमिनीचा पोत सुधारण्यासाठी वसंतराव नाईक कृषि विद्यापीठाच्या बायोमिक्सचा वापर करून जिवाणू स्लरी तयार करून पिकांना देण्यासंदर्भात माहिती दिली.

फवारणी करताना घ्यावयाची काळजी संदर्भात विस्तृतपणे माहिती देऊन सुरक्षित किटचा वापर करून फवारणी करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. कापूस पिकाच्या मूल्य साखळीची माहिती देऊन शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग उभारणी संदर्भात मार्गदर्शन केले.

पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक दीपक दळवी यांनी गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनासाठी कामगंध सापळे लावण्याचे प्रशिक्षण करून दाखवले.

कृषी सहाय्यक नितीन पाटील, कमलाकर राऊत, ज्ञानेश्वर जाधव यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कामगंध सापळे इमामेक्टिन बेंजोएट निंबोळी अर्क निविष्ठा वाटप केल्या.

सदर शेतीशाळेला कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत.

________________________

गुलाबी बोंडअळी करिता आर्थिक नुकसान पातळी सर्वेक्षण :-

दर आठवड्याला शेताचे प्रतिनिधित्व करतील अशा वीस ओळी निवडाव्यात, प्रत्येक ओळीतील एक अशी वीस बोंडे किंवा फुलांची निरीक्षणे घ्यावीत त्यापैकी दोन बोंडांत किंवा फुलांमध्ये गुलाबी बोंडअळी आढळून आल्यास आर्थिक नुकसानीची संकेत पातळी समजून रासायनिक कीटकनाशकाचा वापर करावा.

 नितीन पाटील – कृषी सहाय्यक

________________________

गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाचे उपाय :-

मोठ्या प्रमाणात नर पतंग पकडण्यासाठी पेक्टिनो ल्युर सह २५ फनेल सापळे प्रति हेक्टरी लावावेत.

आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास शिफारशीतील पुढील कीटकनाशकांचा वापर करावा. प्रमाण प्रति १० लिटर पाणी.

प्रोफेनोफॉस ४० टक्के अधिक सापरमेथ्रीन ४ टक्के ईसी (संयुक्त) १० मिलि किंवा थायामेथोक्झाम १२.६ अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ९.५ झेडसी (संयुक्त) ४ मिलि किंवा क्लोरअँट्रानीलिप्रोल ९.३ अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ४.६ झेडसी (संयुक्त) ४ मिलि किंवा पायरिप्रॉक्झीफेन ५ अधिक फेनप्रोपॅथ्रीन (१५ ईसी) १० मिलि. 

 कापूस पीक उंच वाढल्याने फवारणी करताना विषबाधा होऊ नये यासाठी सुरक्षा साधनांचा वापर करावा.

कमलाकर राऊत, कृषी सहाय्यक

________________________

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!