आपला बीड जिल्हा

भाटुंबा येथील जि.प.माध्यमिक शाळेत शिक्षक दिन उत्साहपुर्ण वातावरणात साजरा

वादळवार्ता वार्तांकन – महादेव काळे

केज तालुक्यातील भाटुंबा येथील जिप माध्यमिक शाळेत सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती म्हणजेच शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणुन शिनगारे सर(सेवा निवृत्त मुअ,डिघोळअंबा) हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन मुख्याध्यापक डॉ.एस.व्ही. कांचनवार,डॉ.आर.जी.मुळे व श्रीमती व्ही.जी.आचार्य हे होते.

       या प्रसंगी शिक्षक दिनाचे औचित्य साधुन शिक्षण प्रेमी युवा ग्रामच्या वतीने सर्व शिक्षक कर्मचारी यांचा सत्कार केला.

इयत्ता पहिले ते दहावी च्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषय कृतज्ञता व्यक्त केली.

         चि.पियुष गणेश मस्के या विद्यार्थ्याच्या वाढदिवसानिमित्त इयत्ता पहिली च्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य रजिस्टर व पेन्सिलचे वाटप करुन एक आगळा वेगळा उपक्रम राबवला.

         प्रमुख अतिथी डॉ.कांचनवार,डॉ.मुळे व श्रीमतीआचार्य मॕडम यांनी आपले शैक्षणिक विचार मांडले.

     याच कार्यक्रमात उच्च शिक्षणातील सर्वोत्तम पदवी डॉक्टरेट मिळविल्या बद्धल डॉ.कांचनवार सर व डॉ.मुळे सर यांचा सत्कार शाळेच्या व युवा ग्रामच्या वतीने करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सुञ संचालन वैष्णवी चवरे हिने तर आभार संस्कृती चवरे यांनी मानले.

या कार्यक्रमासाठी श्री.आंधळे सर,श्री.क्षीरसागर सर,श्री.भारती सर,चौरे सर,ठाकर मॕडम,अंबाड मॕडम,शिंदे सर,दशरथ मस्के,नरहरी चौरे, गणेश मस्के,धपाटे सर, अक्षय धपाटे,अभिजित धपाटे,अमर धपाटे, रोहित धपाटे,विश्वजित धपाटे,रोहन धपाटे,शुभम जोगदंड गणेश मस्के व इतर गांवकरी उपस्थित होते.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!