वादळवार्ता वार्तांकन – मुबशीर खतीब
मैत्री कधी तुटायाची नाही आपण म्हणतो पण प्रत्यक्षात ते ही पहायला मिळत आहे. दिवाळीच्या सणानिमित्त सर मित्र मैत्रिणी आपल्या गावाकडे एकत्र येतात आणि जुन्या आठवणींना उजाळा देतात.
याच प्रमाणे दहिफळ (वडमाऊली) येथील शाम उच्च माध्यमिक विद्यालयातील २००३ ला इयत्ता १२ वि उत्तीर्ण झालेले वर्ग मित्र या वेळी दिवाळीच्या सनामुळे एकत्र येत गेट टूगेदर कपिलधार येथे दर्शन घेऊन साजरा केला.
कपिलधार येथे गेल्यानंतर आपल्या वर्गातील जुन्या आठवणींना उजाळा देत बऱ्याच दिवसांनी भेटी झाल्या चा आनंद प्रत्येक मित्र मैत्रीनीच्या चेहऱ्या दिसून येत होता. त्या नंतर सर्व मित्र मैत्रिणींनी मांजरसुम्बा येथील हॉटेल कन्हैया येथे जाऊन सर्वांनी सोबत भोजनाचा आनंद घेतला.
यावेळी शशिकांत ढाकणे (प्राथमिक शिक्षक) द्रोपती नागरगोजे ( बस वाहक) सुनिल ठोंबरे (सावकार) मोरे सुनिल, (शिक्षक) अप्पा घोळवे सोलापूर (एम बी ए ), रमेश सोनवणे, (शिक्षक उस्मानाबाद), विश्वास घोळवे (औरंगाबाद), राम मोराळे (शिक्षक – बीड), बापूराव पाळवदे (शिक्षक – भूम), वैशाली मोराळे पुणे (वन -अधिकारी पुणे), डॉ. उषा मुंडे (पुणे), अनिता माने (पोलिस – बीड), बळीराम पाळवदे (आर्मी) इत्यादी उपस्थित होते.