आपला बीड जिल्हा

केज नगरपंचायतच्या कचरा व्यवस्थापनाचे चौकशीच्या आदेशामुळे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर होणारे अमरण उपोषण कांही काळासाठी मागे

वादळवार्ता वार्तांकन – केज

केज नगरपंचायत कचरा व्यवस्थापनाचे बीड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत चौकशीचे आदेश आल्यामुळे त्या आदेशाचा सन्मान करत माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या कार्यालयासमोर होणारे अमरण उपोषण कांही काळासाठी मागे घेण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे कि केज नगरपंचायत कार्यालयामार्फत कचराव्यवस्थापनात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली , होत असल्याचे निवेदन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ बीड च्या वतीने दिले होते त्या अनुशंगाने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दुसऱ्यादा चौकशी करण्याचे आदेश पत्र दिले आहे सदरील चौकशी पत्राचा सन्मान करुन विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयासमोर दि २० अक्टोबर रोजी होणारे आमरण उपोषण विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना 19 अक्टोबर रोजी एका निवेदनाव्दारे मागे घेण्यात आले आहे .

जिल्हाधिकारी साहेब बीड यांच्या दुसऱ्यांदा दिलेल्या चौकशी पत्रावर चौकशी किती दिवसात होईल. चौकशी समिती नेमतील की नाही ? यांकडे सर्व केज तालुक्याचे लक्ष लागले आहे .

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!