आपला बीड जिल्हाआपले केजक्राईम

केज तालुक्यात तीन वेगवेगळे अपघात मात्र जीवित हानी नाही

वादळवार्ता – गौतम बचुटे

केज तालुक्यात होळीच्या दिवशी तीन वेगवेगळे अपघात घडले आहेत यात वाहनांचे नुकसान झाले आहे परंतु कोणीही जखमी किंवा जीवित हानी झालेली नाही

दि. ६ मार्च रोजी कापरेवाडी येथून केज-कळंब रोडने कळंबकडे हरबरा विक्रीसाठी घेऊन जात असलेले पीक अप क्र. (एम एच-४४/यु २२८५) याने रात्री १०:३० वा. च्या सुमारास साळेगाव येथे गित्ते वस्ती जवळ ऊस वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला मागून धडक दिली. यात पिकअपचे नुकसान झाले. मात्र जिवीत नाही किंवा कोणी जखमी झाले नाही.

दुसऱ्या घटनेत केज-बीड रोडवर दि. ६ मार्च रोजी ११:०० वा. सुमारास गंगा माऊली साखर कारखान्या जवळ कदमवाडी पाटी जवळ खुशाल ट्रॅव्हल्सच्या नांदेड-पुणे ट्रॅव्हल्स क्र. (एम एच-२७/ए-९९९५) ने ट्रॅक्टरला मागून धडक. त्यामुळे ट्रॅव्हल्सचे मोठे नुकसान

कोणीही जखमी नाही झाले नाही तर ट्रॅक्टर स्त्याच्या कडेच्या खड्ड्यात पलटी झाले यात ट्रॅक्टर व ट्रॅव्हल्सचे नुकसान झाले आहे तर अन्य तिसऱ्या घटनेत केज-बीड रोडवर दि. ६ मार्च रोजी १२:०० वा. च्या सुमारास मस्साजोग येथे मालवाहू ट्रक क्र. (एम एच-१२/यु एम-८७३४) हा बस स्टॅंड जवळ दुभाजकाला धडकला. यात ट्रकचे नुकसान झाले मात्र कोणीही जखमी नाही.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!