आपला बीड जिल्हाआपले केजक्राईम
हरिणाची शिकार करणारे चार शिकारी मांस व शिकारीचे साहित्यासह पोलिसाच्या ताब्यात
स्थानिक गुन्हे शाखेची केज तालुक्यात मोठी कारवाई
तिघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी तर एक अल्पवयीन
प्रतिनिधी/केज
केज तालुक्यात वरपगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून हरिणाची शिकार करून त्याच्या मासांची वाटणी करीत असताना चौघांना रंगेहाथ ताब्यात घेत त्यांना अटक केली आहे. चौघा शिकाऱ्या पैकी एकजण अल्पवयीन असून तिघांना न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या बाबतची अधिक माहिती अशी की, दि. २४ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरक्षक मुरकुटे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जगताप, पोलीस जमादार गायकवाड, पोलीस हवालदार शिंदे, पोलीस हवालदार राठोड, पोलीस नाईक राजू पठाण, यादव, उगले आणि वडमारे हे केज उपविभागात गस्त घालीत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी फोनव्दारे पोलीस उपनिरिक्षक मूरकुटे यांनी कळविले की. केज तालुक्यातील वरपगांव शिवारात पारधी वस्तीवर राहणारे बन्सी पवार याचे पत्राचे शेडमध्ये काळविट मारुन त्याचे वाटे करणे चालू आहे. त्या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले. आदेश मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरपगाव येथे सायंकाळी ६:३० छापा टाकला. त्यावेळी बन्सी पवा यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये भैय्या बन्सी पवार, सुनिल ज्ञानोबा पवार, लाला शहाजी शिंदे आणि एक अल्पवयीन मुलगा हे चार ईसम गोलाकार बसुन काळवीटाचे मासांचे हत्याराने तुकडे वाटे करताना दिसले. त्याचे समोर एक काळवीटाचे दोन शिंगे असलेले मुंडके, ईतर दोन काळवीटाचे शिंगे होती. त्यांना पोलिसांनी आम्ही ताब्यात घेतले. त्या नंतर दोन पंचा समक्ष भैय्या बन्सी पवार याचे ताब्यातुन काळवीटाचे कापलेले दोन शिंगे असलेले मुंडके, लाला शहाजी शिंदे याचे ताब्यातुन काळवीटाचे दोन शिंगे, संजय बन्सी पवार याचे ताब्यातुन एक विळा, एक सुरा, एक कत्ती, एक चाकु हे साहित्य तसेच सुनिल ज्ञानोबा पवार याचे ताब्यातुन अंदाजे २० किलो वजनांचे काळवीटाचे मासांचे व हाडाचे तुकडे दोन पंचा समक्ष जप्त करण्यात आले. मुद्देमाल जप्त करते वेळी धाराशिव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरक्षक सचिन खटके, सहाय्यक पोलीस निरिक्षक अमोल मोरे, पोलीस हवालदार हुसेन सय्यद, पोलीस हवालदार प्रदीप वाघमारे हे उपस्थित होते.
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हनुमान खेडकर यांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात भैय्या बन्सी पवार, सुनिल ज्ञानोबा पवार, लाला शहाजी शिंदे आणि एक अल्पवयीन मुलगा गु र नं. ४५८/२०२४ वन्य जीव प्राणी संरक्षण कायदा अधिनियम १९७२ चे कलम ३, ४९, ५०, ५१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार बाबासाहेब बंगर हे तपास करीत आहेत.
तिघा शिकाऱ्यांना न्यायालयाने दि. २८ ऑगस्ट पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
संभाजीनगर विभागाचे मुख्य वनसंरक्षक हनुमंत धुमाळ आणि विभागीय वनाधिकारी ए डी गरकल यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त वनपाल नवनाथ पाईक, वनपरिक्षेत्र अधिकारी उत्तम चिकटे आणि वनपाल मोरे यांच्या आदेशाने वनमजूर वचिष्ट भालेराव, संभाजी पारवे, नवनाथ जाधव, वाहन चालक शाम गायसमुद्रे सिद्धेश्वर चव्हाण ऑपरेटर मनोज डोरनाळे, जीवन गोके यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. पी. थळकरी, डॉ. श्वेता जोशी, डॉ. प्रितम आचार्य, डॉ. प्रल्हाद जाधव, सुशील मस्के, डॉ. धोंडिबा चवडे, डॉ ऋषीकेश सिरसट यांच्या पथकाने काळविटाचे शवविच्छेदन केले. अधिक तपासासाठी त्याचा व्हिसेरा राखून ठेवला आहे.