केज न.प.चे सुस्त प्रशासन अडीज वर्षाने झाले खडबडुन जागे ; घाणीचे साम्राज्य हटविण्याच्या तीव्र हालचालीला आला वेग
केज । प्रतिनिधी
दैनिक वादळ वार्ताला बातमी आली आणि केजचे नगरपंचायत प्रशासन खडबडून जागे झाले आणि युद्ध पातळीवर घाणीचे साम्राज्य हटवण्यासाठी तीव्र हालचालीला वेग आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असा की काल दिनांक 21/07/2024 या दिवशी प्रभाग 16 मध्ये काँग्रेसचे शहर अध्यक्ष ताहेर कुरेशी यांनी मागासवर्गीय वस्तीमध्ये घाणीचे साम्राज्य ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी एक बॅनर लावले त्या बॅनर वरती केज नगरपंचायत आणि यश कंट्रक्शन यांच्या नावावरती चपलांचा हार घालून जाहीर निषेधाचे बॅनर लावले.या अनुषंगाने आलेली दैनिक वादळ वार्ता मध्ये बातमी याचा दणका प्रशासनाने घेतला व आज 22 ऑगस्ट रोजी केज नगरपंचायतचे प्रशासन सदरील ठिकाणचे घाणीचे साम्राज्य काढण्यासाठी त्या जागेवरती दाखल होऊन स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे. तसेच सदरील स्वच्छता हि स्वच्छ होण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा वेळ लागणार असल्याचे कळते.या आगळ्यावेगळ्या आंदोलनामुळे काँग्रेसचे शहराध्यक्ष ताहेर खुरेशी केज शहरातील जनतेच्या चर्चेत आले आहेत.व त्यांच्या आगळ्यावेगळ्या आंदोलनाची सर्व केज शहरात जोराची चर्चा सुरू आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!